आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सतरा नंबरच्या परीक्षा पद्धतीत बदल, दुरुपयोग टाळण्यासाठी शिक्षण मंडळाचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कुणी गुणांसाठी, तर कुणी उत्तीर्णतेसाठी बाहेरून म्हणजे १७ नंबरचा फाॅर्म भरून परीक्षा देतात. या प्रक्रियेचा गैरफायदा घेत अनेक खासगी महाविद्यालये, विद्यालये आणि शिकवणी घेणारे विद्यार्थी आणि संस्था तासिकांऐवजी शिकवणीच्या नावाखाली परीक्षा केंद्र बदलून घेतात. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर अधिक भार येतो आहे. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी बोर्डाने आता १७ नंबर अर्ज प्रक्रिया करणाऱ्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला असून, जिल्हास्तरावरीलच विद्यालय आणि महाविद्यालयात विद्यार्थ्यांना हा अर्ज भरून परीक्षेला बसता येणार आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षेला विद्यार्थी मोठ्या संख्येने बसतात. मात्र, काही अडचणींमुळे, तर काही आर्थिक विवंचनेमुळे १७ नंबरचा अर्ज भरून बहिस्थ पद्धतीने परीक्षेला बसतात. मात्र, या पद्धतीचा वापर काही विद्यार्थी आणि संस्था या स्वार्थासाठी करतात. परिणामी ग्रामीण भागात जाऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. यातील कुणी उत्तीर्ण हाेण्यासाठी, तर कुणी गुण सुधारण्यासाठी बाहेरच्या केंद्रावरून परीक्षेसाठी अर्ज करतात. यामुळे परीक्षा केंद्रांवरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. यामुळे सुविधा देतानादेखील अडचणींचा सामना करावा लागतो. औरंगाबाद शहरातून दरवर्षी ३० ते ३५ हजार विद्यार्थी १७ नंबर अर्जाच्या आधारे परीक्षा देतात. राज्य शिक्षण मंडळाने या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार जिल्ह्याच्या ठिकाणाहूनच आता या प्रक्रियेचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...