आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Changes In Production Technology And Creativity To Culture DR. Anil Kakodkar

कल्पकतेला तंत्रज्ञान अन् उत्पादनात बदलणार्‍या संस्कृतीची आवश्यकता- डॉ. अनिल काकोडकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आपल्याकडे कल्पनांच्या निर्मितीची वानवा नाही. मात्र, कल्पकतेला तंत्रज्ञानात आणि तंत्रज्ञानाला प्रत्यक्ष समाजोपयोगी उत्पादनात बदलण्याची धमक निर्माण व्हावी लागते. त्याशिवाय नवनिर्माण वा संशोधनाला महत्त्व प्राप्त होत नाही, असे मत अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
चेंबर्स ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अँग्रिकल्चर (सीएमआयए), आस्था फाउंडेशन आणि एमआयटी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आयोजित यशवंत व्याख्यानमालेत ‘टुवर्ड्स अँन इनोव्हेशन सोसायटी’ या विषयावर डॉ. काकोडकर यांनी विचार मांडले. ते म्हणाले, भारतात नवनिर्माणाच्या माध्यमातून उद्योगांना विकास साधण्याची संधी आहे. मात्र, समाजोपयोगी संशोधनाला पूरक संस्कृती नाही. त्यामुळे संशोधनासाठी उत्तेजन देणारी संस्कृती विकसित करणे गरजेचे आहे. उद्योग आणि अभियांत्रिकी संस्थांमध्ये सामंजस्य करार केल्यामुळे ज्ञानाची निर्मिती होणार नाही.
त्यासाठी आपल्याला संस्कृतीत बदल घडवणे आवश्यक आहे. नवनिर्मिती फक्त शहरांतून होत नाही, ग्रामीण भागातही संशोधक आहेत, त्यांच्याकडेही कटाक्ष टाकला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. आयआयटी संस्था आणि विद्यापीठांतून अनेक अभियंते बाहेर पडतात. त्यांना उद्योगांमध्ये नोकरीही मिळते. मात्र, दुसरीकडे बेरोजगार अभियंत्यांचेही प्रमाण अधिक असल्याची खंत डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे, सीएमआयएचे अध्यक्ष मिलिंद कंक आदींची उपस्थिती होती.