आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छावणीतील गुरांच्या बाजारात २३ गाई, १० बैलांचा मृत्यू; ३० गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - छावणीतीलगुरांच्या बाजारात आणलेली ३२ जनावरे अचानक मृत झाल्याची घटना बुधवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. मृत जनावरांमध्ये २३ गाई आणि १० बैलांचा समावेश आहे. ३० जनावरांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, स्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हा बाजार बंद राहील, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
छावणी परिसरात दर बुधवारी आणि गुरुवारी गुरांचा बाजार भरतो. महाराष्ट्र, गुजरात आणि इतर राज्यांतूनही या बाजारात गुरे विकण्यासाठी येतात. जनावरांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यांचा व्हिसेरा तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असून या अहवालानंतर जनावरांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. जनावरांच्या बाजाराचा कंत्राटदार अजीज देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गंभीर जनावरांवर पशू चिकित्सालयात उपचार
बाजारातआणलेल्या उर्वरित जनावरांची चारापाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गंभीर जनावरांवर खडकेश्वर येथील पशू चिकित्सालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सहायक आयुक्त जी. एन. पांडे, वीरेंद्र गायकवाड, डॉ. एम. एन आठवल आदी मंडळी जनावरांना उपचार मिळावे यासाठी परिश्रम घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...