आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लेखणी बंद' नंतर दिग्गजांवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - बजाजनगरातील धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटवताना २८ ऑक्टोबरला दुपारी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट यांच्यासह इतरांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच तहसीलदारांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली होती. या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिस टाळाटाळ करत होते. परंतु महसूल संघटनेच्या लेखणी बंद आंदोलनानंतर खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट यांच्यासह ४० जणांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल झाला. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी दिली.

उच्च न्यायालयाच्या आदेशाने बजाजनगरात एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण झालेले बालाजी मंदिर, संत नरहरी महाराज मंदिर, साईबाबा मंदिर, चर्च, हनुमान मंदिर आदी धार्मिक स्थळे हटवण्यात आली. परंतु संत नरहरी महाराज मंदिराचे अतिक्रमण काढताना दुपारी वाजता खासदार चंद्रकांत खैरे तेथे आले प्रचंड संताप व्यक्त केला. त्यांच्यासोबत आमदार संजय शिरसाट, नगरसेवक नंदकुमार घोडेले, शिवाजी बनकर, संजय शहाणे, तालुकाप्रमुख बप्पा दळवी, मीरा पाटील, जयश्री घाडगे शिवसैनिक होते. प्रशासकीय कर्मचारी पाडापाडी करत असताना कर्मचाऱ्यांसह पोलिसांवर त्यांनी आगपाखड केली. तसेच शासकीय जीपमध्ये बसलेल्या तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्यावरही ते धावून गेले. त्यांच्यावर हातही उगारला.
घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या कॅमेरामनलाही त्यांनी धमकी दिली. या प्रकारानंतर त्यांनी तोडलेल्या अतिक्रमित मंदिरांच्या ठिकाणी जाऊन तेथील मूर्तींची पुन्हा प्रतिष्ठापना केली. ३० ऑक्टोबरला मुंडलोड यांच्यासह ५० अधिकारी,कर्मचाऱ्यांनी वाळूज एमआयडीसी ठाण्यात तक्रार देऊनही गुन्हा नोंदवला नव्हता. महसूल संघटनेने आंदोलन पुकारल्यानंतर या प्रकरणात कारवाई झाली. पोलिसांनी जणांवर गुन्हा नोंदवला. यात कलम १४३ नुसार जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, कलम ३५३ नुसार शासकीय कामात अडथळा (अजामीनपात्र, दोन वर्षांचा कारावासाची शिक्षा), कलम २९४ नुसार अश्लिल भाषेत शिविगाळ (३ ते महिन्यांचा कारावास एक हजाराचा दंड), कलम १०९ नुसार चिथावणी देणे, कलम ११४ कलम नुसार चिथावणी देताना समक्ष हजर असणे, कलम ५०४ नुसार शिविगाळ करणे कलम ५०६ नुसार धमकी देणे (या दोन्ही कलमात दोन वर्षांपर्यंत कारावास दंड) आदी कलमांखाली गुन्हा दाखल झाला. दरम्यान, अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाळूज, पंढरपूर, बजाजनगर भागात पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

आदेशाचे पालन करताना घटना
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाचे पालन करत असताना ही घटना घडली. माझ्यासोबत घडलेला प्रकार तक्रारीत नमूद आहे. आता पुढील काम पोलिसांचे आहे. सर्व काही नियमानुसार होईल. रमेश मुंडलोड, तहसीलदार.

जबाब नोंदवणार
सर्वशासकीय कर्मचारी उपस्थित असताना तहसीलदारांसोबत हा प्रकार घडला. त्यात एमआयडीसीचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी यांचे जबाब नोंदवले जातील. शिवाय, चित्रफीत पाहून दोषींना ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येईल. रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक, वाळूज एमआयडीसी.
बातम्या आणखी आहेत...