आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Charge Sheet Filed Against Namdevshastri For Breaking Modal Code Of Conduct

भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती न्यायाचार्य डॉ. नामदेवशास्त्री सानप यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा पाथर्डी पोलिसांनी दाखल केला आहे. हा गुन्हा म्हणजे राजकीय सूडभावनेने रचलेले षड्यंत्र असून या गुन्ह्याचा जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी निषेध केला आहे. दरम्यान, हा गुन्हा मागे घेण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सानप यांनी पत्रकात दिला आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की, श्रीक्षेत्र भगवानगडावरील दसरा मेळावा हा पारंपरिक उत्सवाचा एक भाग आहे. भगवानगडाच्या पावित्र्याला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे बदनामी केली आहे.