आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Charges File Against School, Hospital For Mobile Tower Trimbak Tupe

टॉवर असलेल्या शाळा, हॉस्पिटलवर गुन्हे दाखल करणार - महापौर त्र्यंबक तुपे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात ३०० पेक्षा जास्त मोबाइल टॉवर अनधिकृत असून एका एका टॉवरवर एक डझनपेक्षा जास्त अँटेने लावले आहे. त्यातून निघणाऱ्या किरणोत्सर्गामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत होतात. त्यानंतरही शाळा, हॉस्पिटलवर हे मोबाइल टॉवर लावण्यात आल्याचे शेख समिना, सायरा बानो यांनी सर्वसाधारण सभेत उघड केले. तसेच ज्या इमारतींवर टॉवर उभारले जातील, त्यांना कर लावण्यात येईल, असे महापौर त्र्यंबक तुपे यांनी सांगितले.

शहरात किती मोबाइल टॉवर आहेत, त्यांच्याकडून मनपाला किती उत्पन्न मिळते, याबाबत समिना यांनी माहिती मागवली होती. त्यावर अधिकाऱ्यांनी ३७३ मोबाइल टॉवर असून त्यापैकी ७३ अधिकृत असून उर्वरित अनधिकृत असून त्यांच्याकडून कराच्या दुप्पट वसुली होत असल्याचे उपायुक्त रवींद्र निकम यांनी स्पष्ट केले. ही चुकीची माहिती असून शहरात पाच हजार मोबाइल टॉवर असल्याचे सायरा बानो यांनी सांगितले. ज्या घरांवर, इमारतींवर मोबाइल टॉवर आहे, त्यांना कोणता टॅक्स लावतो याची माहिती नगरसेवकांनी विचारली असता त्यांना व्यावसायिक कर लावण्यात येत नसल्याचे शिवाजी झनझन यांनी सांगितले.
एका टॉवरकडून महिन्याला ३५ हजार रुपये भाडे मिळते. मात्र, घरांना इमारतींना नियमित कर लावण्यात येतो. या घरांसह ज्या अपार्टमेंटवर टॉवर असतील त्या पूर्ण अपार्टमेंटला व्यावसायिक कर लावण्याचे आदेश तुपेंनी दिले. यातून निघणारे किरणोत्सर्ग आरोग्यास घातक असूनही शाळा, रुग्णालयावर टॉवर लावल्याचे फोटो समिना शेख यांनी दाखवले. त्यावर हे टॉवर काढून आणखी सर्व्हे करा, एका टॉवरवर एकपेक्षा जास्त अँटेना असल्यास त्यांना दंड लावून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही तुपे यांनी दिले.