आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार्ली म्हणतात, लोकांना समजावून सांगितले तर ऐकतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबादकर वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, ते बेशिस्त आहेत, असे नेहमी बोलले जाते. मात्र, त्यांना प्रेमाने समजावून सांगितले तर ते ऐकतात, असा अनुभव गस्तीसाठी नव्याने नेमण्यात आलेल्या चार्लींना आला. सीपी सरांनी आमच्यावर टाकलेली जबाबदारी चोखपणे पार पाडू, असा आमचा संकल्प आहे, असे त्यांनी सांगितले.
शहराची शांतता कायम ठेवण्यासाठी नेमलेल्या यंग चार्लींच्या कामाचा मंगळवारी पहिला दिवस होता. डोक्याला बांधलेला काळा कपडा, हातात वॉकीटॉकी, चेहऱ्यावर उत्साह आणि अंगात खाकी वर्दी असलेले चार्ली शहरात उत्सुकतेचा विषय ठरले. या तरुण पोलिस कर्मचाऱ्यांनीदेखील आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत आपले कर्तव्य बजावण्याचा अाटोकाट प्रयत्न केला. ज्या ठिकाणी तंटे झाले, त्या ठिकाणी अवघ्या पाच मिनिटांत हे पथक हजर झाले. विठ्ठल जोगदंड, उमेश सागडे, अरुण पाडळे, सतीश जाधव या चार्लींसोबत संवाद साधला असता ते म्हणाले, सीपी सरांनी ही जबाबदारी टाकली आहे. ती कुठल्याही परिस्थितीत पार पाडणार आहोत.
तंटा सोडवला
सिडको येथील कालिकामाता मंदिराच्या समोर पार्किंगवरून वाद सुरू होते. वाद घालणारा काही केल्या ऐकत नव्हता म्हणून काही व्यक्तींनी कंट्रोल रूमला फोन करून सांगितले. त्यावरून त्या भागात असलेले चार चार्ली त्या ठिकाणी पोहोचले आणि तंटा सोडवण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रकरण हाताबाहेर गेल्यानंतर सिडको पाेलिसांशी संपर्क साधत त्याला ठाण्यात नेण्यात आले. याशिवाय शहागंज, मुकुंदवाडीतील भाजी मंडईत वाहतुकीची कोंडी हाेऊ नये याकडेही लक्ष दिल्याचे चार्लींनी सांगितले.