आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: ‘केमिस्ट्री’ पेपरमध्ये 16 कॉपीबहाद्दरांना पकडले, शिक्षणाधिकाऱ्याच्या संस्थेतच 12 कॉपी केसेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
औरंगाबाद- बुधवारी झालेल्या बारावीच्या रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये १६ कॉपी केसेस आढळून आल्या, तर एका शिक्षणाधिकाऱ्याच्या संस्थेतच १२ कॉपी केसेस आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

आज सकाळच्या सत्रात केमिस्ट्री आणि दुपारच्या सत्रात इतिहास विषयाचा पेपर होता. प्रौढ निरंतर शिक्षण विभागाच्या पथकाने दिलेल्या केंद्रांवरील भेटीमध्ये तपासणी दरम्यान हिरापूर, सुंदरवाडी येथील जयहिंद पब्लिक स्कूल, कनिष्ठ महाविद्यालयात बारा कॉपीचे प्रकार आढळून आले. या विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात यावी.
 
 
तसेच केंद्र बंद करण्यात यावे, अशी माहिती बोर्डाला कळवण्यात आली आहे, असे या पथकाच्या लता सानप यांनी सांगितले, तर कॉपीमुक्त अभियान राबवा म्हणून शाळांना सूचना करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये कॉपीचे प्रकार होत असल्याचेही समोर आले आहे. जयहिंद महाविद्यालय ही संस्था एका शिक्षणाधिकाऱ्याची आहे. आज झालेल्या पेपरमध्ये एकूण १६ कॉपी प्रकरणे आढळून आली. त्यापैकी १४ कॉपी प्रकरणे औरंगाबादमधील असून, प्रकरणे खुलताबाद येथील आहेत. 
बातम्या आणखी आहेत...