आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉपीयुक्त वातावरणात दहावीची परीक्षा सुरू; जि. प. शाळांत विद्यार्थ्यांवर खाली बसण्याची वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिक्षण विभागाची कॉपीमुक्तीची दवंडी दहावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी धाब्यावर बसवण्यात आल्याचे चित्र मंगळवारी शहरासह ग्रामीण भागात दिसून आले. अनेक ठिकाणी सर्रास कॉप्या सुरू होत्या. जिल्हा परिषदांच्या शाळांत विद्यार्थ्यांवर खाली बसून परीक्षा देण्याची वेळ आली. शिवाय काही शाळांमध्ये यंत्रणेवर नजर ठेवणारे जॉइंट चीफच देण्यात आलेले नव्हते. 

मंगळवारी मराठी, उर्दू आणि फ्रेंच विषयांची परीक्षा होती. औरंगाबादमधील ६७ हजार ५६६ विद्यार्थ्यांसाठी २० परिरक्षक आणि ५८४ केंद्रे आहेत. पहिल्याच दिवशी परीक्षा बोर्ड नियोजनात नापास झाले. कारण शिवाजीनगरातील कलावती चव्हाण हायस्कूलसह अनेक शाळांमध्ये जॉइंट चीफ वेळेवर हजरच नव्हते. मुख्य केंद्रांवरून शिपाईच प्रश्नपत्रिका घेऊन आले. एकही विद्यार्थी खाली बसून परीक्षा देणार नाही असे नियोजन केल्याचा बोर्ड अध्यक्ष शिशिर घोनमोडे यांचा दावा होता. प्रत्यक्षात फुलंब्री तालुक्यातील लाडसावंगीसह अनेक जिल्हा परिषदांच्या शाळांत विद्यार्थ्यांना खाली बसावे लागले. फक्त केंद्र संचालक, कस्टोडियन यांच्याकडेच मोबाइल असेल, असेही बोर्डाने म्हटले होते मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूलसह काही शाळांत पर्यवेक्षकांकडे मोबाईल होते. 

सीसीटीव्हींचा पत्ता नाही
कॉपीमुक्तपरीक्षेसाठी परीक्षा केेंद्रांच्या प्रवेशद्वारावरच सीसीटीव्ही बसवण्यात यावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिल्या होत्या. मात्र, अनेक केंद्रांवर सीसीटीव्ही नसल्याचे दिसून आले. महसूल विभागाने नेमलेले पथकही बहुतांश ठिकाणी पोहोचलेच नाही.
 
त्या विद्यार्थ्यांचे फोन जमा करा
दरम्यान,ढवळापुरे येथील कमलसिंग नाईक या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे मोबाइल जमा करून घेण्यात आले होते. ते परत करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जप्तीबद्दल बोर्डाला कळवण्यात आले नाही. यावर बोर्डाच्या सचिव वंदना वाहूळ यांनी सांगितले की, ही गंभीर बाब आहे. परीक्षा केंद्रावर मोबाइल आणण्यास मनाई आहे, याची माहिती बोर्डास कळवायला हवी. 

गाइड जाळले
जयभवानीविद्यालयात विद्यार्थ्याकडे गाइड आढळून आले. ते जाळून टाकण्यात आले. तर अन्य एका विद्यार्थ्याकडील कॉप्या जप्त करण्यात आल्या. 

चौकशी करू
विद्यार्थ्यांनाखाली बसावे लागले, हे आज कळाले. फर्निचर नसल्याचे मुख्याध्यापकाने सांिगतले होते. पण त्यावर उपाययोजना करता आली नाही. उद्या तेथे व्यवस्था केली जाईल. तसेच कॉपी प्रकरणाची चौकशीही होईल, असे एसएससी बोर्डाचे विभागीय अध्यक्ष शिशीर घोनमोडे यांनी सांगितले. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...