आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूर तालुक्यात कॉपीचा महापूर; 2 कर्मचारी निलंबित तीन जण रडारवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार- नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील दादासाहेब माणिकराव गावित सार्वजनिक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दहावीच्या परीक्षेत मंगळवारी अक्षरश: काॅप्यांचा ‘महापूर’ अाल्याचे दिसून अाले. या प्रकरणी या केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांना तfत्काळ निलंबित करण्यात आले असून, तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दक्षता समितीने दिले आहेत. माजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्याशी संबंधित हे महाविद्यालय अाहे. 

केंद्रप्रमुख, कर्मचारी आणि पोलिस पुरवत होते विद्यार्थ्यांना कॉप्या...
'माय मराठी'च्या पेपरला चक्क शाळेतील केंद्रप्रमुख, कर्मचारी आणि पोलिस विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवत असल्याचे चित्र विसरवाडी येथील माजी मंत्री माणिराव गावित विद्यालयात दिसून आले. केंद्रप्रमुख व पोलिस मात्र बघ्याची भूमिकेत दिसले. या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे.  
 
नंदुरबार जिल्ह्यात मागील वर्षी पोलिसच कॉपी पुरवत असल्याचा प्रकार समोर आला होता. यंदा पोलिसांसमोर तसेच केंद्र संचालकांसमोर नातेवाईक बाहेरून येऊन कॉपी पुरवत असल्याच्या घटनांसमोर आली आहे. दहावीच्या पहिल्याच पेपरला विद्यार्थी खुलेआम कॉपी करत असल्याचा आढळून आले. गावीत हायस्कूलमध्ये पर्यवेक्षकांच्या मेहरबाणीने चक्क विद्यार्थी कॉपीसाठी पुस्तके गाईड आणि झेरॉक्स प्रत वापरत असल्याचे चित्र कॅमेरातून कैद झाले आहे.

परीक्षार्थ्यांकडे गाईड आणि झेरॉक्स प्रत...
विद्यार्थी पेपर लिहिताना पुस्तके, गाईड आणि झेरॉक्स प्रत जवळ ठेवून खुलेआम कॉपी करत होते. पोलिस मात्र, बघ्याची भूमिका बजावताना दिसले. विशेष म्हणजे परीक्षा केंद्रात पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असताना दिसले.

विद्यार्थ्यांचे भविष्य सापडले कॉपीच्या विख्याळात...
आदिवासी दुर्गम जिल्हा अशी नंदुरबारची ओळख असताना विद्यार्थ्यांचे भविष्य कॉपीच्या विळख्यात सापडले आहे. या केंद्रात चक्क बंदोबस्तावर असलेल्या पोलीसांना समोरच कॉपी पुरवणारे भिंतीवरुन उड्या मारुन कॉपी पुरवत असल्याचे चित्र दिसून आले. याहुनही भयावह प्रकार म्हणजे या इमारतीतील परिक्षा वर्गात नातेनाईकच कॉपी पुरवण्यासाठी सर्रासपणे जात असल्याचे दिसून आले.

विसरवाडीच्या या केंद्रात इतक्या सर्रासपणे कॉप्या सुरु असतांना शाळेतील बैठे तपासणी आणि भरारी पथक नेमके काय करत होते? असा सवाल उपस्थित होत आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा... कॉपी बहाद्दरांचा व्हीडिओ..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...