आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जन-धन योजनेच्या वारसाला दोन लाखांच्या धनादेशाचे वितरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन लाखांचा धनादेश पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव यांच्या हस्ते उषा जाधव यांना देण्यात आला. - Divya Marathi
दोन लाखांचा धनादेश पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव यांच्या हस्ते उषा जाधव यांना देण्यात आला.
गंगापूर - येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेच्या जनधन योजनेच्या खातेदाराच्या वारसाला प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेच्या विम्याचा दोन लाखांचा धनादेश पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव यांच्या हस्ते देण्यात आला. बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये जनधन योजनेचे खातेदार रावसाहेब रतन जाधव यांनी प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेअंतर्गत ३३० रुपयांचा विमा काढला होता. परंतु त्यांचा आजारपणात मृत्यू झाला. त्यांची वारस पत्नी उषाबाई जाधव यांना विम्याचा दोन लाखांचा धनादेश बँकेच्या वतीने २२ नोव्हेंबर रोजी देण्यात आला. या वेळी शाखा प्रबंधक प्रभाकर जरे, उपप्रबंधक धनजंय, सुरेश छापरवाल, भाऊसाहेब जाधव, शामला कांबळे, अनिल सातदिवे, अॅड. दत्ता पानकडे, भागीनाथ भिवसने, सचिन खाजेकर, करण बेडवाल, अर्जुन मंडलिक, मिलिंद जाधव, अर्जुन मोढे आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...