आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Checking Papers Issue At Dr. Bamu Campus News In Marathi

विद्यापीठात केंद्रीय पद्धतीने होणार उत्तरपत्रिकांची तपासणी, प्राध्यापकांच्या मनमानीला चाप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागातील प्राध्यापकांची मनमानी रोखण्यासाठी विद्यापीठाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांची केंद्रीय पद्धतीने तपासणी केली जाणार आहे.

आम्हीच उत्तरपत्रिका तपासतो, अशी शेखी मिरवून गुणदानात भेदभाव करणार्‍या प्राध्यापक मंडळींना चाप बसवण्यासाठी परीक्षा विभागाने काही महत्त्वपूर्ण बदल आणि निर्णय घेतले आहेत. त्यानुसार यापुढे विभागात नव्हे तर परीक्षा विभागात बसून केंद्रीय पद्धतीने उत्तरपत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. हा निर्णय परीक्षा विभागाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. ही बैठक प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण, डॉ.विलास खंदारे तसेच डॉ.बाबू शेख यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीतच हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोडिंग पद्धतीचा वापर
केंद्रीय पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणी करण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून आता पदव्युत्तरच्या सर्व विभागांची उत्तरपत्रिका तपासणी केंद्रीय म्हणजे एकाच ठिकाणी करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे उत्तरपत्रिकांची सुरक्षितता राहील. शिवाय कोडिंग पद्धतीने उत्तरपत्रिकांचे काम केले जाईल, असेही सूत्रांनी सांगितले. या निर्णयाचे विद्यार्थी संघटनांनीदेखील स्वागत केले असून यामुळे गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

मनमानी थांबणार
विद्यापीठात एकूण 42 पदव्युत्तर विभाग आहेत. त्यांत जवळपास अडीच ते तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. सर्वच गोष्टींवर नियंत्रण ठेवणे अवघड असल्याने काही विभाग स्वायत्त करण्यात आले आहेत, परंतु त्यामुळे या विभागातील प्रमुखांच्या मनमानीनुसार परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे आणि उत्तरपत्रिकांची तपासणी केली जाते. अनेकदा र्मजीतल्या विद्यार्थ्यांना अधिक गुण दिले जातात. तसेच तुमचे गुण आमच्याच हातात आहेत, असे सांगून प्राध्यापक विद्यार्थ्यांवर दबावतंत्राचा वापर करतात. यामुळे उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा तसेच एकाच ठिकाणी पेपर तपासणी असावी, अशी विद्यार्थ्यांकडून मागणी होत होती.