आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केमिकलच्या वाफेने कामगाराचा मृत्यू, एमआयडीसीमधील बी. बी. केमिकल कंपनीतील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
पैठण- एमआयडीसीमधील बी. बी. केमिकल या कंपनीत सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास केमिकलच्या धुराच्या वाफेमुळे एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दिलीप म्हसू भिसे (वय ४२) असे मृत कामगाराचे नाव अाहे. 

यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बी. बी. केमिकल या कंपनीत मागील दोन वर्षांपासून दिलीप म्हसू भिसे हा कामगार काम करतो. नेहमीप्रमाणे दिलीप भिसे हा कंपनीत आला. तो केमिकलच्या टाकीमध्ये रासायनिक द्रव टाकत असताना त्याच्या अंगावर हे केमिकल पडल्याने तो गंभीर जखमी झाला. यात या कामगाराच्या नाकात रासायनिक द्रव्याची वाफ गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दिलीपला तत्काळ औरंगाबाद येथील हायटेक रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि ज्ञानेश्वर पायघन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...