आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत औषध विक्रेत्यांचा शुक्रवारी बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नवीन औषधी धोरणातील व्यावसायिकांचा नफा कमी करणार्‍या तरतुदी, तसेच अनेक राज्यांत फार्मासिस्टच्या उपलब्धतेचा प्रश्न, औषध विक्रेत्यांचा नाहक कायदेशीर त्रास थांबवणे या विषयांवर देशभरातील औषध विक्रेत्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार शुक्रवारी (10 मे) शहरासह जिल्हय़ातील 2200 औषधी दुकाने बंद राहणार आहेत.

औषध विक्रेता संघटनेचे सचिव दिलीप ठोळे यांनी सांगितले की, जिल्हय़ात एकूण 2200 औषधी दुकाने आहेत. त्यापैकी 1400 औरंगाबाद शहरात आहेत. ही सर्व दुकाने 10 तारखेला बंद राहतील. मात्र, तातडीची औषधे रुग्णांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आंदोलनाचा एक भाग म्हणून 10 तारखेला सकाळी 10 वाजता पैठण गेटपासून औषध विक्रेते गुलमंडीमार्गे वाहन रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार असून तेथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले जाणार आहे.