आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘चेन्नई एक्स्प्रेस’चे आरक्षण फुल्ल; 3 मार्चला शहरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मागील वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात घोषित चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेस 2 मार्च रोजी चेन्नईहून निघणार आहे. या गाडीचे आरक्षण फुल्ल झाले असून ती 3 मार्चला औरंगाबाद स्थानकावर सकाळी 9.40 वाजता येईल. मागच्या रेल्वे अर्थसंकल्पात अजनी-कुर्ला, निजामाबाद-कुर्ला व चेन्नई-नगरसोल गाड्यांना मान्यता देण्यात आली होती. नगरसोल-नरसापूर ही रेल्वे नियमित करण्यात आली.

केवळ-चेन्नई-नगरसोल (16003) या दक्षिण रेल्वेच्या गाडीस मुहूर्त सापडत नव्हता. नगरसोल येथे सकाळी 11.55 वाजता पाहोचेल. परतीच्या प्रवासाला ती 3 मार्चलाच निघणार असून चेन्नईला 4 मार्च रोजी दुपारी 4 वाजता पोहोचेल. रेल्वे प्रत्येक शनिवारी चेन्नईहून निघून रविवारी औरंगाबादला पोहोचेल. नगरसोलहून रविवारी परतीच्या प्रवासास निघून सोमवारी चेन्नईला पोहोचेल.

या गाडीला 11 स्लीपर, एक टू एसी, 4 थ्री एसी व दोन साधारण डबे राहतील. औरंगाबादहून स्लीपर क्लास 470 रुपये, टू एसी 1840 रुपये, थ्री एसी 1260 रुपये तिकीट राहील. रेल्वे चेन्नई सेन्ट्रल, अरकोनम, तिरुपती, रेनिगुंठा, गुट्टी, कनरूल, महेबूबनगर, काचिगुडा, कामारेड्डी, निजामाबाद, नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद, नगरसोल या मार्गाने येईल व परत याच मार्गाने जाईल.

दरम्यान, रेल्वे लेखानुदान 2014-2015 साठी औरंगाबाद-रेनिगुंठा व नांदेड-औरंगाबाद या दोन साप्ताहिक गाड्यांचीही घोषणा झाली आहे.