आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेक घोटाळ्यात कंपनीचे अधिकारी? ‘त्या’ भामट्याचे 53 लाख गोठवले!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दिल्लीच्या भारती इन्फ्राटेल लिमिटेड कंपनीचा चेक हस्तगत करून सहा लाख रुपये स्वत:च्या खात्यात वळवणा-या कोलकाता येथील भामट्याचे खाते गोठवण्यात आले आहे. या खात्यात 53 लाख रुपये आहेत. या घोटाळ्यात कंपनीचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी असल्याचा संशय बळावला आहे, अशी माहिती सिडकोचे पोलिस निरीक्षक मारुती डब्बेवाड यांनी दिली.
कोलकात्याच्या दिनेशकुमार या भामट्याने कंपनीच्या मुंबई एसबीआय बँकेतील खात्याचा 5 लाख 95 हजार 765 रुपयांचा चेक हस्तगत करून कोलकात्याच्या कॅनरा बँकेत स्वत:च्या खात्यावर जमा केला. चेक वटण्याची प्रक्रिया आॅनलाइन असल्याने कॅनरा बँकेने 12 नोव्हेंबर 2011 ला पंजाब नॅशनल बँकेमार्फत हा चेक एसबीआयच्या सिडको शाखेत पाठवला . चेक पास होऊन रक्कम कंपनीच्या खात्यातून वजा करण्यात आली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँक अधिका-यांचे धाबे दणाणले. सिडको पोलिस ठाण्यात धाव घेण्यात आली. अल्ट्रा व्हायोलेट मशीनद्वारे हा चेक तपासण्यात आला. त्यानंतर त्याच्या कोलकात्याच्या कॅनरा बँकेतील खाते गोठवण्यात आले. या भामट्याविरुद्ध जळगाव आणि नाशिकमध्येही गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे.
कंपनीच्या अधिका-यांवर संशय
‘भारती इन्फ्राटेल’ खात्याचा संबंधित चेक वठल्यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई कंपनीच्या अधिका-यांकडे वळली आहे. या चेकवर दोन वरिष्ठ अधिका-यांच्या सह्या आहेत. त्यामुळेच हा चेक वठला गेला. त्यामुळÞे भामट्याशी संबंधित अधिका-यांचे संगनमत असावे, असा पोलिसांचा तर्क आहे.