आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"चेतना अभियान' रोखणार आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/यवतमाळ - सततचा दुष्काळ आणि नापिकी यातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने बळीराजा चेतना अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या विदर्भातील यवतमाळ व मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात हे अभियान राबवले जात आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील सिंचन सुविधांसाठी सरकार ६८७ कोटी रुपये देणार असल्याची माहिती यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
असा मिळणार निधी
यवतमाळ जिल्ह्यातील १६ सिंचन प्रकल्पांची क्षमता २०१५-१६ ते २०१७-१८ या काळात वाढवायची आहे. त्यासाठी तीन टप्प्यांत निधी येणार आहे.
सर्वेक्षण व उपाय
सरकारच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी, हे कार्यालय प्रयत्न करणार आहे. या कार्यालयामार्फत शेतकरी आत्महत्याविषयी सर्वेक्षण करण्यात येतील. तसेच विविध आढावा बैठकांतून त्यावर उपाय शोधण्यात येणार आहेत.
आत्महत्या मुक्ती
यवतमाळ जिल्ह्यात १२०७ ग्राम पंचायती आहेत. आत्महत्या रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला एक लाखाचा निधी देण्यात येणार आहे. बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत हा निधी मिळेल. यवतमाळ व उस्मानाबाद जिल्हे दोन वर्षांत आत्महत्यामुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे.