आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुद्वारांमध्ये छबील उत्सव; औरंगाबादेत ठंडाईचे वाप; ठिकठिकाणी लंगर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शिखांचे पाचवे धर्मगुरू अरजन देवजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज शहरातील तीन गुरुद्वारांच्या वतीने ‘छबील’ उत्सव साजरा करण्यात आला. मोंढा नाका आणि रेल्वेस्टेशन येथे ठंडाईचे वाटपही यानिमित्ताने करण्यात आले.

गोविंदसिंगपुरा येथील गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभा, जीटीबीनगर येथील श्री गुरू तेगबहाद्दूर लंगर साहेब आणि धावनी महोल्ला येथील भाईदयासिंग गुरुद्वारा यांच्या वतीने हा उत्सव एकत्रितरीत्या साजरा करताना 8 ते 10 हजार नागरिकांना ठंडाई, कच्ची लस्सी वोटप करण्यात आली. यानिमित्ताने गेल्या 7 दिवसांपासून अखंडपाठचे वाचन सुरू होते. नगरकीर्तनसह प्रार्थनाही करण्यात आली. सर्व भाविकांसाठी लंगरचे आयोजन करण्यात आले होते. शहरात गेल्या 50 ते 45 दिवसांपासून हा दिवस साजरा करण्यात येतो, अशी माहिती हरमिंदरसिंग सलुजा यांनी दिली.

काय आहे छबील
शिखांचे पाचवे गुरू अरजन देवजी महाराज यांना समाप्ती दिवस छबील या नावाने साजरा करण्यात येतो. याविषयीची कथा अशी आहे की, चंदू शाह नावाचा सावकार होता. त्याला आपल्या एकु लत्या एक मुलीचा विवाह करायचा असतो. यासाठी त्याला सर्वदृष्ट्या उत्कृष्ट मुलगा हवा होता. त्यांना गुरू अरजनदेवजी यांचा मुलगा हरगोबिंद सिंग पसंत पडतो. मात्र, गुरुजींनी या विवाहाला नकार दिला. या अपमानाने शाह पेटून उठला आणि त्याने राजा अकबराकडे गुरूंची तक्रार केली. पवित्र ग्रंथात हिंदू-मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह असे वर्णन अरजनदेव यांनी केल्याचे त्याने अकबराला सांगिल्याने गुरुजींना अटक झाली. मात्र, तथ्य तपासल्यावर अकबराने गुरूंना निदरेष ठरवत सोडून दिले. अकबराच्या मृत्यूनंतर शाह याने त्याचा मुलगा जहांगीरकडे ही तक्रार केली. जहांगीरने गुरूंना अटक करून उकळत्या पाण्यात टाकले, गरम तव्यावर बसवून चटके दिले. हा अत्याचार सतत पाच दिवस सुरू होता. यानंतर रावी नदीमध्ये गुरुजींनी प्राणत्याग केला. तो दिवस छबील म्हणून साजरा करण्यात येतो.

शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
शहरातील दोन ठिकाणी करण्यात आलेल्या वाटपाचा मोठय़ा संख्येने नागरिकांनी लाभ घेतला. यानिमित्ताने अरजनदेवजी यांनी दिलेल्या शिकवणींना उजाळाही देण्यात आला.