आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: प्रेम करा, पण गड-किल्ल्यांवर, स्वतःला लैला-मजनू समजू नका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या स्‍पर्शाने पावन झालेली सुंदर गड-किल्‍ले हे महाराष्‍ट्राचे वैभव आहे. जगात कुठेही नसतील एवढे किल्‍ले महाराष्‍ट्रात आहेत. शेकडो वर्षांपासून विविध काळातील वंश आणि धर्माच्‍या सत्‍ताधीशांनी या देशात किल्‍ले बांधले. शिवरायांनी अनेक किल्ले ताब्यात घेतले. पूर्वी बांधलेल्या किल्ल्यांपैकी काहींची डागडुजी केली. राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा, खांदेरी अशा वैशिष्‍ट्यपूर्ण किल्‍ल्‍यांसाठी मराठे रात्र दिवस राबले. मात्र, त्‍या गड-किल्‍यांच्‍या भिंती आज प्रेमवीरांच्‍या भावनांनी रंगलेल्‍या दिसत आहेत. चुना किंवा खडूने गडांवर नावे लिहून अद्भूत कलाकृतीचे नमुने आणि गडांचे सौंदर्य धोक्‍यात येऊ शकते. त्‍यामुळे अशा प्रवृत्‍तींवर वचक बसायला हवा.
पुढील स्‍लाइड्सवरील फोटोंमध्‍ये पाहा, प्रेमवीरांनी रंगवल्‍या किल्‍ल्‍यांच्‍या भिंती..