आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे सहा उद्योजक मुख्यमंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्यात सहभागी होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २९ जून ते २ जुलै अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. ते न्यूयॉर्क, डेट्राॅइट आणि कॅलिफोर्नियाला भेट देणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि सरकारी वरिष्ठ अधिकारी व शिष्टमंडळ राहणार आहे. या शिष्टमंडळात औरंगाबादच्या सहा उद्योजकांचा सहभाग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मेक इन महाराष्ट्र' अशी घोषणा केली आहे. सीएमआयएच्या वतीने मराठवाड्यात उद्योगवाढीसाठी डेस्टिनेशन मराठवाडा फॉर मेक इन इंडिया या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या शिष्टमंडळात सीएमआयएचे मुकुंद भोगले, उमेश दाशरथी, एस. डी. तांबोळकर, एन. श्रीराम, सुनील किर्दक आणि भूषण जोशी यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...