आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकलठाणा एमआयडीसीतील रस्त्यावर अडचणींचा डोंगर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरुंदरस्ता, खड्डे आणि उखडलेली खडी, त्यात दुरुस्तीसाठी आणून टाकलेला मुरूम आणी मातीचे ढिगारे. यामुळे धूळ, धूर आणि प्रदूषणाचा अतिरेक झाला आहे. गेल्या

वर्षांपासून चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची ही अवस्था आहे. एकूण २८ पैकी १४ किमी रस्त्याची ही स्थिती. कित्येक दिवसांपासून रस्त्याला समांतर ते फूट

माती-मुरूम आणून टाकला आहे. त्यात खड्डे आणि दगड-गिट्टी यामुळे या रस्त्यावरून जाणे म्हणजे दिव्य पार करण्यासारखे आहे. दुसरीकडे या भागात दिवे नाहीत. त्यामुळे उद्योजक, कामगार आणि आसपासच्या १८ गावांमधील हजारो लोक त्रस्त झाले आहेत. बिले दिल्याने ठेकेदाराने काम अर्धवट सोडले, तर मनपा मात्र तांत्रिक अडचणींचेकारण पुढे करते.

डीबी स्टारने चिकलठाणा एमआयडीच्या रस्त्यांंचा प्रश्न उचलून धरला. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन मनपा आयुक्त भापकर यांनी १३ रस्त्यांच्या दुरुस्तीला १७

सप्टेंबर २०११ रोजी मंजुरी दिली; पण काम डिफर्ड पेमेंटच्या योजनेत असल्याने ठेकेदारांनी पाठ दाखवली. कसेबसे गुरुनानक इन्फ्रास्ट्रक्चरला हे काम देण्यात आले.

बिलेथकवली, काम थांबले
१३रस्त्यांपैकी काही रस्त्यांचे काम वरील कंपनीने केले, मात्र मनपाने ३० कोटींची देयके थकवल्याने ठेकेदारांनी पुढील कामास नकार दिला. त्यामुळे चिकलठाण्यातील ग्रीव्हज

ते सीपेट, सीटीआर-लिपी बॉयरल ते ब्रिजवाडी, मुकुंदवाडी ते औरंगाबाद धरमकाटा, मस्तकन्या सहकारी संस्था ते शीतगृहे, ग्रीव्हज कॉटन ते अनिल केमिकल्स, हिंदुस्थान

पेट्रोलपंप ते नारेगाव चौक, पेपरपॅक इंडस्ट्रीज ते मसनतपूर आणि डब्ल्यू सेक्टरमधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना ग्रहण लागले.

एमआयडीसीसाठी४७ कोटी
चिकलठाणाऔद्योगिक वसाहतीतील रस्त्यांसाठी मनपाने ४७ कोटी निधी मंजूर केला होता, पण डिफर्ड पेमेंटमधून काम करण्यासाठी कसाबसा एकच ठेकेदार पुढे आला.

त्यात त्याने वर्षांत रडतपडत १४ किलोमीटरचे रस्ते तयार केले. उर्वरित १४ किलोमीटर अंतराचे रस्ते तसेच ठेवले.

रस्तारून टाकले ढिगारे
दोनमहिन्यांपूर्वी ठेकेदाराने पुन्हा या कामाला सुरुवात केली. त्याने मुकुंदवाडी मध्यवर्ती एसटी कार्यशाळा ते
पानवर

लवकरच काम करू
-काही तांत्रिक बाबींमुळे काम बंद होते. त्या अडचणी दूर करून आम्ही पुढील आठवड्यात काम चालू करणार आहोत.
-बी.डी. फड, उपअभियंता,मनपा.

पैसेदिले तरच काम
-एमआयडीसीसह शहरातील इतर कामांचे ३० कोटी रुपये पालिकेने थकवले आहेत. आयुक्त आमचे फोन रिसिव्ह करत नाहीत. दालनाला सतत कुलूप असते. किती दिवस

उसनवारीवर काम करणार? मनपाने पैसे दिल्यास एमआयडीसीचे काम सुरू करणार. हरविंदरसिंहबिंद्रा, जी.एन.आय.कन्स्ट्रक्शन

-गेल्या २५ वर्षांत फक्त २०११ मध्ये १४ किलोमीटरचे रस्ते केले. नगरसेवक राजू शिंदे, तत्कालीन महापौर आयुक्तांनी पाहणी करून सर्व रस्ते चकाचक होतील, असे

आश्वासन दिले होते; पण ते हवेत विरले. -भारतमोतिंगे, उद्योजक