आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधांमुळेच काढला पतीचा काटा, बदनापूर येथून पत्नीला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चिकलठाणा परिसरातील नवपुते वस्तीत उघडकीस आलेल्या विलास आव्हाड खून प्रकरणातील मुख्य आरोपी संगीता आव्हाड हिला बदनापूर येथील शेलगाव येथून पोलिसांनी अटक केली, तर दुसरा आरोपी शेख गफ्फार शेख गनी याला देवळाईतून अटक करण्यात आली आहे. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
शेख गफ्फार आणि संगीता हिचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. याची कुणकुण विलासला लागताच दोघांत भांडण सुरू झाले. संगीताचा मुलगा किशोर यालादेखील या संबंधांविषयी माहिती होती. गफ्फारचा रेतीचा व्यवसाय होता. त्याच्या गाडीवर मृत विलास हा चालक म्हणून काम करत होता. गफ्फारचे विलासच्या घरी येणे-जाणे होते. त्यातूनच त्याची आणि संगीताची ओळख होऊन प्रेमसंबंध सुरू झाले होते. त्याचा कायमचा काटा काढायचा असे या दोघांनी ठरवले. गफ्फार हा चिकलठाणा परिसरात असलेल्या प्लॉटवर थांबला होता. विलासला संगीताने भाजीतून विष दिले. त्यानंतर गळा आवळून खून केला. त्याच्या अंगावर मुरूम टाकला. मात्र तो मेला की नाही ही शंका असल्यामुळे संगीता पुन्हा घटनास्थळी गेली त्याच्या अंगावर पुन्हा मुरूम टाकला. हा प्रकार सुनेला कळाला आणि सर्व प्रकार समोर आला, अशी माहिती मुकुंदवाडी पोलिसांनी दिली.

असे उलगडले कोडे
हा प्रकार सून सुरेखा हिने आजीसासू शांताबाईला सांगितल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. मुकुंदवाडी पोलिसांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. त्याच्या माहितीवरून पुरलेले प्रेत काढले. त्यानंतर मुलगा किशोर याला अटक केली. त्यानंतर गफ्फारचे धागेदोरे सापडले. शेलगाव येथून शुक्रवारी संगीताला अटक केली. ही कारवाई सहायक उपायुक्त राहुल श्रीरामे निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक साईनाथ गिते, वामन गावंडे, जनार्दन निकम, कैलास काकड, दीपाली हजारे यांच्या पथकाने केली.
बातम्या आणखी आहेत...