आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chikhaldara Picnic Spot In Amaravati, Latest News In Marathi

चिखलदरा पर्यटनस्थळाच्या विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष, गावीलगड किल्ल्याची दुरवस्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सातपुडापर्वतांच्या कुशीत वसलेल्या चिखलदरा येथे विलोभनीय पर्यटनस्थळ देश-विदेशातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. वर्षभर लाखो पर्यटक विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी येतात. मात्र येथे मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. याकडे सिडको, नगरपालिका, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पुरातत्त्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने १५ ते १७ ऑगस्टदरम्यान पत्रकारांसाठी चिखलदरा पर्यटन अभ्यास दौरा आयोजित केला होता. सातपुडा पर्वतांच्या किमी लांब किमी रुंद पठारावर वसलेल्या या वननगरीत भीमकुंड, देवीचे पुरातन मंदिर, ९०० वर्षांपूर्वींचा गावी लगड किल्ला, वनऔषधी जंगल आणि उद्यान, कॉफीचा मळा, कॅक्टस उद्यान, मोझरी पॉइंट, सनसेट पॉइंट, व्याघ्र प्रकल्प म्युझियम, हरिकेन पॉइंट, खोल दरी, पाण्याचे धबधबे, दाट जंगल, बकादरी, कलालकुंड आदी प्रेक्षणीय स्थळे आहेत. गावीलगड किल्ल्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. येथील अरुंद रस्त्यांमुळे अपघात होतात. निवास व्यवस्था अपुरी आहे. पर्यटकांना तीन महिने आधी बुकिंग करावी लागते. वेळेवर येणाऱ्या पर्यटकांना अवाजवी किंमत मोजावी लागते. शॉपिंग कॉम्प्लेक्स, शहर सौंदर्यीकरणाचा अभाव आढळून आला. गावीलगड किल्ल्याकडे पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केल्याने अशी दुरवस्था झाली आहे.
विकास आराखडा तयार
चिखलदरा विकासाचा आराखडा तयार असून बोर्डाकडे पाठवला असून लवकरच शासनाला सादर केला जाईल. शासनाची मंजुरी मिळताच कामे पूर्ण करण्यात येईल. जागा निश्चित झाल्याशिवाय काहीच करता येणार नाही. हाय मास्क, रस्ता रुंदीकरण, काही नवीन व्ह्यू पॉइंट या बाबींचा विकास करण्याचे नियोजन केले आहे. हे काम करत असताना वनसंपदा, वन्यजीव, पर्यावरण संवर्धनाचा संरक्षणाला जास्त महत्त्व दिले जाईल.
-आशुतोष उईके, वरिष्ठ नियोजनकार, सिडको.

सोयी सुविधा हव्यात
व्ह्यूपॉइंटकडे जाणारे सर्व अरुंद रस्ते आहेत, गाईड प्रशिक्षित नाहीत. येथील हॉटेलमध्ये दोन ते अडीच हजार रुपये मोजून राहणे परवडणारे नाही. सुटीच्या दिवशीच डब्बा पर्यटकांची गर्दी असते. ऐतिहासिक किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. अरविंदगिरी, सेवानिवृत्तपोलिस अधिकारी.

सिडकोचा आराखडा कागदावर
सिडको प्रशासनाने चिखलदरा पर्यटनस्थळाच्या विकासासाठी ८५० कोटींच्या खर्चाचे नियोजन केले आहे. मात्र हा आराखडा कागदावरच आहे. सिडकोच्या परवानगीशिवाय आम्हाला काहीच करता येत नाही. ८५ कोटींचा विकास निधी या कारणामुळेच परत गेला आहे. विकासकामांचे अनेक प्रस्ताव त्यांच्याकडे पडून आहेत. आमच्याकडे निधीची कमतरता नाही, पण परवानगीच मिळत नाही, असे नगराध्यक्ष राजेंद्र सिंह सोमवंशी यांनी सांगितले.