आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तिच्या’ गोंदणाने ‘तो’ गजाआड!, मृतदेह जाळून मारेकरी पोलिसांची कारवाई बघत होता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिच्या हातावरील गोंदणच तिच्या मारेकऱ्याला गजाआड करण्यास पुरेसे ठरले.  (प्रतिकात्मक) - Divya Marathi
तिच्या हातावरील गोंदणच तिच्या मारेकऱ्याला गजाआड करण्यास पुरेसे ठरले. (प्रतिकात्मक)
औरंगाबाद - हात आणि पाय वगळता त्याने तिचे संपूर्ण शरीर जाळून टाकले. पण तिच्या हातावरील गोंदणच तिच्या मारेकऱ्याला गजाआड करण्यास पुरेसे ठरले. मृत तरुणीच्या हातावर चंद्रकला असे नाव गोंदलेले होते. १४ लाख लोकसंख्येच्या शहरात हजारो चंद्रकला असतील. गवताच्या गंजीतून हरवलेली सुई शोधून काढण्यासारखे काम होते. चंद्रकला नावाची एखादी महिला हरवली काय, याची माहिती घेऊन आठच दिवसांत पोलिस तिच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचले आणि चिकलठाणा येथे १६ जूनला नाल्याजवळ सापडलेल्या मृत महिलेच्या खुनाला वाचा फुटली. शैलेश अजय बेंजामिन (२५) रा. सिडको एन ६ असे चंदा अनिल अंभोरे, रा. जयभवानीनगर हिच्या मारेकऱ्याचे नाव असून अनैतिक संबंधातूनच हा खून केल्याची त्याने कबुली दिली आहे.
चंद्रकलाची या अगोदर दोन लग्ने
बेंजामिन आणि चंदा यांचे गेल्या काही वर्षांपासून अनैतिक संबंध होते. तो विवाहित तर चंद्रकलाची या अगोदर दोन लग्ने झाली होती. माझ्याशी लग्न कर, असा हट्ट चंद्रकलाने धरला होता. मात्र तो तिला टाळत होता. तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या बहिणीचे लग्न होऊ देणार नाही, असे ती त्याला म्हणत होती, असे बेंजामिनने पोलिसांना सांगितले. याशिवाय ती त्याच्याकडे ५० हजारांची मागणीही करत होती. २२ जून रोजी बेंजामिनच्या बहिणीचा साखरपुडा होता. तो चंदामुळे मोडू शकतो, या भीतीने त्याने तिचा काटा काढला.

घरात पडून होते प्रेत :
चंदा जयभवानी नगर येथे राहत होती. घटनेच्या दिवशी शैलेश तिच्या घरी गेला असता दोघांत वाद झाला. त्याने तिचा गळा आवळून खून केला. कार चालक असलेल्या बेंजामिनने तिच्या दोन मुलांना कारमध्ये बसवून जालना येथे चंदाच्या आईकडे सोडले. रात्री तो औरंगाबादला परतला. त्याने कॅनमध्ये पेट्रोल विकत घेतले. रात्री दीडपर्यंत तो सिडकोत भटकत राहिला. रात्री दीड वाजता त्याने मृतदेह कारमध्ये टाकून चिकलठाणा गाठत तिच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून टाकले.

यांनी केला तपास :
पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त सुदर्शन मुंढे, निरीक्षक श्रीपाद परोपकारी, उपनिरीक्षक नेताची गंधारे, राम अत्तरदे, मुंडले, विक्रम वाघ यांनी हा गुन्हा उघडकीस आणला. या पथकाला पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

मिसिंग रिपोर्टवरून ओळख
मृत महिलेचे नाव चंद्रकला असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी या वयोगटातील शहरातील सगळ्या पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या मिसिंग रिपोर्टची माहिती घेतली. त्यानंतर तिची ओळख पटली आणि तपासाला वेग आला. तिला ओळखणाऱ्या विविध लोकांचे जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी शैलेश बेंजामिन यास उचलले.
पुढील स्लाइडमध्ये, मारेकरी दुसऱ्या दिवसी घटनास्थळी होता हजर
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...