आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमधील माळीसागजच्या ग्रामस्थांना चिकुनगुन्याची लागण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - तालुक्यातील माळीसागज गावात चिकुनगुन्या या संसर्गजन्य आजाराने दोन दिवसांपासून थैमान घातले आहे. गावातील ५० टक्के नागरिकांना आजाराची बाधा झाली असल्याचा प्राथमिक महिती ग्रामपंचायतीच्या सरपंचानी दिली. विशेषत: इंदिरानगर या अदिवासी वसाहतीत नागरिकांना मोठ्या प्रमाणात आजाराची बाधा झाली आहे.

याप्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पंचायत समितीचे प्रभारी सभापती सुभाष जाधव यांनी सायंकाळी गावात भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांना गावातील ५० टक्के नागरिकांना चिकुनगुन्याचा अति त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने बोरसर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी डॉ.आर.के.कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून माळीसागज येथे रुग्णांवर उपचार करण्यासाठी तातडीने आरोग्य पथकाला पाचारण केले. आरोग्य पथकाने चिकुनगुन्याचा त्रास होत असलेल्या महिला, पुरुष आणि बालकांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. आजाराची बाधा झाल्याचे लक्षणे अाढळून आलेल्या रुग्णाना औषध उपचार करण्यात येत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावात युद्धपातळीवर रुग्णांचे सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे.
बातम्या आणखी आहेत...