आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Child Books Festivel Starts Today, Three Day Events

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालग्रंथोत्सवास आजपासून प्रारंभ, तीन दिवस मेजवानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि शारदा मंदिर कन्या प्रशाला यांच्या संयुक्त विद्यामाने गुरुवारपासून (13 फेब्रुवारी) बालक ग्रंथोत्सवास प्रारंभ होत आहे.ग्रंथोत्सवाची सुरुवात सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडीने होईल. 10.30 वाजता बालसाहित्यिक प्रा. अनंत भावे यांच्या हस्ते, तर संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होणार आहे. ‘अखंडित वाचत जावे’ हा परिसंवाद होईल. यात दूरदर्शनचे नितीन केळकर, आकाशवाणीचे नीळकंठ कोठेकर आणि सेवानिवृत्त ग्रंथालय संचालक रा. श. बालेकर, प्रा. ऋषिकेश कांबळे यांचा सहभाग असणार आहे.

14 रोजी काव्य वाचन, कथाकथन तसेच प्रा. इंद्रजित भालेराव व प्रा. दिनकर बोरीकर यांची मुलाखत होईल. एकनाथी साहित्यावर आधारित कीर्तन सविता मुळे सादर करतील. 15 फेब्रुवारीला वक्तृत्व स्पर्धा होतील. निखिल पाठक यांचा शिवचरित्रावर आधारित ‘महादिव्य’ कार्यक्रम होईल. बाबा भांड व अँड. दिनेश वकील यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होईल.