आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गॅलरीतून पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बीड बायपास रोडवरील अबरार कॉलनीतील श्रेया सत्यपाल कांबळे (दीड वर्ष) ही चिमुकली शनिवारी दुपारी घराच्या दुस-या मजल्यावरील गॅलरीत खेळत होती. अचानक तोल गेल्याने ती गॅलरीतून खाली पडली. कुटुंबीयांनी तिला तत्काळ कमलनयन बजाज रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती खालावल्याने रात्री आठच्या सुमारास तिला घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच श्रेयाचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.