आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेफ्टीटँकमध्ये पडून बालकाचा मृत्यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सेफ्टीटँकमध्ये पडून मरण पावलेल्या पाच वर्षांच्या बालकाचा मृतदेह पोलिसांनी गुरुवारी दुपारी उकरून त्याचे शवविच्छेदन केले. या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विनोद दत्तात्रेय निंबाळकर (लोणी व्यंकनाथ, ता. र्शीगोंदे) हा मुलगा बुधवारी घराशेजारी खेळताना जमिनीलगत असलेल्या उघड्या सेफ्टीटँकमध्ये पडला. त्याच्याकडे कोणाचे लक्ष नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. निंबाळकर कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना माहिती न देता परस्पर अंत्यविधी केला. गुरुवारी पोलिसांना याबाबत माहिती समजली. त्यानंतर निवासी नायब तहसीलदार पोपट कोल्हे, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी सुनील पोटे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. मृतदेह बाहेर काढून पंचासमक्ष शवविच्छेदन केले गेले. नंतर मृतदेहाचे दफन करण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सुभाष नामदेव निंबाळकर यांच्या घराचे काम चालू असून त्यांच्या सेफ्टीटँकमध्ये पडून बालकाचा मृत्यू झाल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.