आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child Death In Aurangabad City Due To Drink Kerosen

औरंगाबाद शहरात रॉकेल प्यायल्याने चिमुकल्याचा अंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भावसिंगपुरा भागातील भीमनगरमध्ये शुक्रवारी (15 मार्च) सकाळी साडेदहाच्या सुमारास दुचाकीची स्वच्छता करण्यासाठी कपामध्ये घेतलेले रॉकेल दोन वर्षांच्या चिमुकल्याने प्यायल्याने त्याचा शनिवारी (15 मार्च) उपचारादरम्यान मृत्यू झाला. अरिहंत प्रकाश अंभोरे असे मृताचे नाव आहे.


प्रकाश हे रॉकेल घेऊन दुचाकीची स्वच्छता करत होते. या वेळी त्यांनी एका कपामध्ये काढलेले रॉकेल अरिहंतने प्राशन केले. त्याला ठसका लागला तेव्हा रॉकेल प्राशन केल्याचे निदर्शनास आले. यानंतर प्रकाश यांनी तत्काळ त्याला घाटीत दाखल केले. उपचार सुरू असताना आज सकाळी 10.30 वाजता त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, उत्तरीय तपासणी करू नये या कारणावरून नातेवाइकांनी घाटीत गोंधळ घातला होता. डॉक्टरांनी नातेवाइकांची समजूत घातली. एक तासाच्या गोंधळानंतर अरिहंतच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद छावणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.