आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री - औरंगाबाद तालुक्यातील चौका येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. आकाश उत्तम डांगर (१६, रा. द्वारकानगर, हडको, औरंगाबाद) असे तरुणाचे नाव आहे.

आकाश आपल्या मित्रांसोबत चौका येथील सारोळा रस्त्यालगतच्या एका तलावात पोहण्यासाठी गेला असता या तलावात पोहताना बुडून मरण पावला. ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडल्यानंतर त्याचा भाऊ सागर उत्तम डांगर याने फुलंब्री पोलिस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
बातम्या आणखी आहेत...