आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पवयीन मुलीला पळवून मध्य प्रदेशात विवाह रचणार्‍या दोघांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - समतानगर येथील अल्पवयीन मुलीला पळवून मध्य प्रदेशात विवाह रचणार्‍या दोघांना क्रांती चौक पोलिसांनी रविवारी जेरबंद केले. विवाहाचा बनाव करणारा भामटा पती मात्र फरार असून दोन्ही आरोपींची 16 ऑगस्टपर्यंत कोठडीत रवानगी केली आहे.

मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील (ता.आलोट) बरडिया राठोर या गावात राहणार्‍या किशोर ठाकूर याने महाराष्ट्रातील दोन साथीदारांसह सतरावर्षीय मुलीला 25 जुलैला पळवून नेले होते. समतानगर येथील रहिवासी गोकुळबाई खरे आणि मेहकर येथील शेख रफिक शेख इब्राहिम यांच्या मदतीने विवाहाचा बहाणा करून मुलीला पळवण्यात आले होते. विवाहाचे आमिष दाखवून पळवल्याची तक्रार मुलीच्या आईने यापूर्वीच पोलिसांत दिली होती. उपनिरीक्षक नितीन आंधळे गुरुवारी (8 ऑगस्ट) दोन्ही आरोपींना घेऊन मध्य प्रदेशात गेले होते.

शुक्रवारी मुलीला ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी ते औरंगाबादेत आले. त्यानंतर मुलीने दिलेल्या जबाबाच्या आधारावर बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे कलम 4 आणि 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय संगनमत करून अपहरण केल्याचाही गुन्हा नमूद आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात हा विवाह लावण्यात आला होता. त्यानंतर मात्र मागील चार दिवसांपासून किशोर ठाकूर हा महाराष्ट्रात आलेला होता. मुलीसोबत आरोपीने अत्याचार केले नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासणी न करताच पोलिसांनी तिला आईच्या स्वाधीन केले.