आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील बालमृत्यूचे आरोग्य विभागाकडून ऑडिट, कारणांचा शोध घेऊन केल्या जाणार उपाययोजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - माता आणि बालमृत्यूच्या बाबतीत राज्यातील अतिजोखमीच्या नऊ जिल्ह्यांमध्ये बीडचा समावेश असल्याने आरोग्य विभाग बालमृत्यूच्या संदर्भात अधिक गांभीर्याने विचार करत आहे. जिल्ह्यातील बालमृत्यूची कारणे समोर येण्यासाठी आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी आता प्रत्येक बालमृत्यूचे आरोग्य विभागाकडून ऑडिट होणार आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केल्यानंतर राज्यातील अतिजोखमीच्या जिल्ह्यात बीडचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही विशेष तज्ज्ञांची नेमणूक केली होती. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत आरोग्य कर्मचारी थेट वंचितांपर्यंत पोहोचून गर्भवती माता आणि बालकांना सर्व प्रकारचे लसीकरण करण्यात येत आहे. सध्या या उपक्रमाचे चौथा टप्पा सुरू आहे. यानंतर आता आरोग्य विभागाने जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक बालमृत्यूच्या कारणांचा शोध घेता यावा आणि यावरून बालमृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करणार आहे. बालमृत्यू झालेल्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी थेट बालमृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन याबाबत माहिती घेणार आहेत. आरोग्य उपकेंद्रस्तरापासून ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने घेतलेल्या बेठकीत याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राथमिक सुचना देण्यात आल्या आहेत. बालमृत्यूच्या ऑडिटमध्ये बालमृत्यूचे कारण काय, बाळ आजारी होता का, त्याला योग्य वेळी उपचार मिळाले का, मिळाले नसतील तर का मिळाले नाहीत, इतर वैद्यकीय कारणे काय आहेत, सामाजिक आणि आर्थिक कारणांची नोंदही या ऑडिटमध्ये करण्यात येणार असून याचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे. बालमृत्यूच्या ऑडिटसाठी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. प्रशिक्षणात बालमृत्यूच्या विविध कारणांची नोंद करण्याची पद्धत, महत्व याबाबत माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

ऑडिट करण्याचे आदेश दिले
दोन महिन्यात जिल्ह्यात झालेल्या बालमृत्यूची माहिती घेऊन त्याचेही ऑडिट करण्याचे आदेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. बालमृत्यू कमी करुन जिल्हा अतिजोखमीतून बाहेर काढण्याचे आरोग्य विभागाचे प्रयत्न असतील. आरोग्य सेवा सुधारणांचा प्रयत्न आहे.'' डॉ.संदीप सांगळे, जिल्हाआरोग्य अधिकारी

आरोग्य विभागाला मदत होईल
जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी बालमृत्यूच्या कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. बालमृत्यूची कारणे ऑडिटमधून समोर येणार असून त्यानुसार जिल्ह्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभागाला नेमक्या उपाययोजना करण्यासाठी मदत होईल.'' डॉ.एच.व्ही. वडगावे, महिला, बाल आरोग्य अधिकारी,

महिन्याला ऑडिट
प्रत्येकमहिन्याला जिल्ह्यात किती बालमृत्यू झाले. त्यांची कारणे काय होती. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती मागवून घेतली जाणार आहे. यासाठी त्यांना विशेष प्रकारचा नमुना देण्यात आला असून या आराखड्यानुसार बालमृत्यूची नोंद होणार आहे.

कारणांचा शोध
बालमृत्यूच्याऑडिटमध्ये बालमृत्यूचे कारण काय, बाळ आजारी होता का, त्याला योग्य वेळी उपचार मिळाले का, मिळाले नसतील तर का मिळाले नाहीत, इतर वैद्यकीय कारणे काय आहेत, सामाजिक आणि आर्थिक कारणांची नोंदही या ऑडिटमध्ये करण्यात येणार असून याचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...