आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child Obecity News In Marathi, Divya Marathi, Dr.Priti Phatale, DB Star, Health

Child Health:तुमचा चिमुकला लठ्ठ तर होत नाही ना?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुटगुटीत मुले सर्वांनाच आवडतात; पण बालपणातील अति स्थूलता म्हणजेच अति लठ्ठपणा ही धोक्याची घंटा आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारासारख्या धोक्यांना सामोरे जावे लागू शकते. रोकडिया हनुमान कॉलनीतील सम्राट इंडोक्रिन इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीस, ओबेसिटी अँड थायरॉइड्सच्या संचालिका आणि आठ वर्षांपासून मुलांची स्थूलता या क्षेत्रात कार्यरत डॉ. प्रीती फटाले यांनी डिसेंबर 2013 मध्ये मेलबर्न येथे जागतिक मधुमेह परिषदेत दोन पेपर सादर केले होते. यात लहान मुलांमधील लठ्ठपणा व त्यामुळे होणारी गुंतागुंत या पेपरमधील माहिती ऐकून सारेच अवाक् झाले. त्यांनी 1800 मुलांचा अभ्यास करून हा पेपर तयार केला होता. त्यातील आकडेवारी खरोखरच लठ्ठपणा कसा जीवघेणा ठरू शकतो हे सांगते.

० महानगरातील 4 पैकी 1, तर लहान शहरातील 6 पैकी 1 मुलगा अति वजनाचा आहे.
० एकतृतीयांश मुलांना मधुमेहाचा त्रास होण्याचा धोका असतो.
० एकतृतीयांश मुले ही उच्च् रक्तदाबाच्या उंबरठ्यावर आहेत.
० सतत टीव्ही पाहिल्यामुळे मुलांचे वर्षभरात 10 किलो वजन वाढते.
पुढे वाचा बालकांतील लठ्ठपणाची कारणे.......