आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकले बोलू लागले छोटा भीम, डोरेमॉनच्या आवाजात, १० वर्षांपर्यंतच्या मुलांना टीव्ही सिंड्रोम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- छोटा भीम, निंंजा हातोडी, डोरेमॉन हे टीव्हीवरील लोकप्रिय कार्टून्स. टीव्ही आणि इतर गॅजेटच्या माध्यमातून ते दररोज घराघरांत येतात. मात्र, चिमुकल्यांच्या मनावर त्यांचा एवढा जबरदस्त परिणाम झाला आहे की मुले सर्रास कार्टून्सच्याच आवाजात बोलू लागली आहेत. शहरातील मानसोपचारतज्ज्ञांंकडे दररोज या प्रकारातील किमान एक केस येत असून मुले कल्पनाविश्वात वावरत असल्याची तक्रार पालक करत आहेत. 

बालमानसशास्त्राच्या नियमानुसार सलग महिने ते तास टीव्ही, मोबाइलवर कार्टून्स बघणे किंवा गेम्स खेळल्यामुळे मुले त्याच विश्वात रमू लागतात. ही मुलेे छोटा भीम, डोरेमॉन, निंजा हातोडी, ऑगी अँड कॉक्रोच या कार्टून्सच्या आवाजात बोलण्यास सुरुवात करतात. ही पात्रे आपल्या भोवताली असल्याचे त्यांना सतत वाटते. अडचणीत ही पात्रे आपल्याला सोडवतील असा त्यांना विश्वास वाटू लागतो. मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक डॉ. संदीप शिसोदे यांच्या जवाहर कॉलनीतील काैन्सेलिंग सेंटरवर दररोज एक पालक अडीच ते १० वर्षांच्या मुलांशी संबंधित अशी तक्रार घेऊन येतो. 

टीव्ही सिंड्रोमची लक्षणे
टीव्हीसिंड्रोम असणारी बालके जन्मत: सामान्य असतात, पण साधारणपणे अडीच वर्षांनंतर त्यांच्यात बदल होऊ लागतात. त्यांची भाषा बदलते. ‘मला भूक लागली’ असे म्हणता ‘भूक लागली मला’ असे सांगतात. शक्यतो कामापुरते, लहान वाक्यातच बोलतात. खेळण्यांमध्ये अधिक रमतात. खेळणी हातात घेणे, त्यांचा वास-चव घेणे सुरू करतात. त्यांच्या खेळात एकलयता राहत नाही. थोड्या वेळातच खेळण्या अस्ताव्यस्त टाकून ते दुसरा खेळ शोधतात. नजरेला नजर भिडवत नाहीत. ही मुले पाण्याला हात लावत नाहीत. पातळ भाजी हात भिजवता केवळ बोटांनी खातात. त्यांंच्या कामाच्या व्यक्तीलाच ते ओळख देतात. 

स्वमग्न होण्याचा धोका 
टीव्ही सिंड्रोमची दररोज एक केस आमच्या सेंटरवर येते. ही मुले कार्टून्सच्या आवाजात बोलतात. तसे हावभाव करतात. यावर वेळीच उपाय केला नाही तर मुले स्वमग्न होण्याचा धोका बळावतो. त्यांना पूर्वपदावर आणण्यासाठी पालकांची मोठी भूमिका आहे. स्वत: गॅजेटपासून दूर राहिले तरच मुलांमध्ये सुधार घडवता येईल. डॉ.संदीप शिसोदे, मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक 
बातम्या आणखी आहेत...