आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकांना 29 जानेवारीला ‘सिद्धार्थ’मध्ये मोफत प्रवेश, शहरात पल्स पोलिओ मोहीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : देशभरात २९ जानेवारी आणि एप्रिल २०१६ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या दिवशी सर्व सरकारी काही खासगी रुग्णालयात बालकांना डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या दिवशी मनपाच्या सिद्धार्थ उद्यानात तीन बूथ लावण्यात येणार असून डोस पिणाऱ्या बालकांसह त्यांच्या पालकांनाही उद्यानात मोफत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुहास जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
 
मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आरोग्य विभागाची पोलिओसंदर्भात बैठक पार पडली. यात शहरातील एक लाख ९६ हजार ८३९ बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. त्यासाठी शहरात ६१४ पोलिओ बूथचे नियोजन आहे. येथे या दोन्ही दिवशी डोस पाजण्यात येणार आहेत. 
 
सकाळी ते सायंकाळी वाजेच्या वेळात डोस देण्यात येणार असून यासाठी ३२ वैद्यकीय अधिकारी, १८०१ कर्मचारी, १२८ सुपरवायझर यांची यासाठी नियुक्ती केली. रेल्वेस्टेशन, बसस्थानक, विमानतळ, टोलनाके, मॉल्स अशा ११८ ठिकाणी बालकांच्या लसीकरणासाठी ट्रांझिट टीम, तर स्थलांतरित मुलांसाठी ११ मोबाइल टीम एक नाइट टीम नियुक्त करण्यात आली आहे. 
 
ज्यांना मोहिमेच्या दिवशी डोस पाजला गेला नाही अशा बालकांना ५२५ टीमद्वारे घरपोच डोस पाजण्याचेही नियोजन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. यासाठी १०५० कर्मचारी ११५ सुपरवायझर असणार असल्याचेही बैठकीत जगताप यांनी सांगितले.
 
 या वेळी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप, पल्स पोलिओ नियंत्रण अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जागतिक आरोग्य संघटनेचे सव्हेलन्स अधिकारी डॉ. सय्यद मुजीब, पालिकेचे सर्व वैद्यकीय अधिकारी, कमलनयन बजाज हॉस्पिटल, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल, सिग्मा हॉस्पिटल, अपोलो क्लिनिक, एमआयटी नर्सिंग होम, रोटरी क्लब अशा विविध संस्थांचे प्रतिनिधी, डॉक्टर्स तसेच छावणीचे वैद्यकीय अधिकारी, यांत्रिकी विभागाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...