आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळ, नृत्य अन् जादूच्या प्रयोगांनी मुलांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निरागस मुले आयुष्याचे कोणतेही संकट असो ते विसरून जीवन जगण्याचे सामर्थ्य ठेवतात. संकटावर मात करताना हसतखेळत आयुष्य जगण्याचा धडा ते सर्वांना सहजच देऊन जातात, याचा अनुभव बालदिनानिमित्त थॅलेसिमिया पीडित मुलांसाठी दिलेल्या पार्टीत पाहायला मिळाला. "बम बम बोले, मस्ती में डोले' या गाण्यात ताल धरत सर्वांनी आयुष्यातील क्षण अविस्मरणीय करून टाकले. तसेच धमाल नृत्य, विविध खेळांबरोेबर जादूगाराच्या प्रयोगाने मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.

बालदिनानिमित्त संगिनी ग्रुपच्या वतीने वेदांतनगर येथील बॅडमिंटन हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या आयोजनात दर्पण ग्रुपनेही योगदान दिले. दोन तासांच्या या पार्टीत धमाल गाण्यांवर नृत्य, आनंदनगरीतील खेळांची रंगत आणि चटपटीत खाद्यपदार्थांचा आनंद लुटला. थॅलेसिमिया सोसायटीच्या ४० मुलांना या पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. संगिनी ग्रुपचीही २५ मुले यामध्ये सहभागी झाली. वेगवेगळ्या लज्जतदार आणि मुलांना आवडतील अशा खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले. याशिवाय रिंग ग्लासमध्ये टाकणे, फुगे फोडणे अशा रोमांचक खेळांतूनही मुलांना खिळवून ठेवण्यात आले. या पार्टीत मुले उत्साहात सहभागी झाले आणि जाताना मिळालेले रिटर्न गिफ्टसुद्धा कुतूहलाचा विषय ठरला.

कार्यक्रमातून आम्हाला शिकायला मिळाले
पार्टीचा उद्देश मुलांचे उद्बोधन करणे असा नव्हता; पण थॅलेसिमिया झालेल्या मुलांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. "संकटात जिद्दीने मात करा, हसत राहा' असा वडीलधाऱ्यांकडून ऐकलेला सल्ला मुलांनी प्रात्यक्षिकातून आमच्या पुढे ठेवला.
वंदना पाटणी, अध्यक्षा, संगिनी ग्रुप
मुलांच्या आनंदासाठी सर्वकाही
बालदिनाच्या निमित्ताने मुलांना कोणती भेट द्यावी, जी कायम स्मरणात राहील असा विचार मनात होता. त्यामधूनही कल्पना सुचली. मुलांनी पार्टीत सक्रिय सहभाग नोंदवत मजा लुटली यात आमच्या आयोजनाचे यश आहे.
सुदर्शना रुणवाल, आयोजक
सर्वांनी मिळून केली धमाल
आमच्या वाढदविसाला पार्टी असते. आतापर्यंत आम्हाला अशी पार्टी कुणीही दिली नव्हती. ज्यात कुणाचा वाढदविस नाही, पण पार्टी आहे. आम्ही सर्वांनी मिळून धमाल केली.
पार्थ दिवेकर