आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकलाकारांनी मांडल्या समस्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - समाजाच्या भीतीने तर कधी परिस्थितीमुळे अनाथाश्रमात सोडलेली मुले, ते जगत असलेले आयुष्य अन् त्यांच्या निरागसतेने कल्पनेतल्या आईला विचारलेला ‘आमचा काय दोष?’ या प्रश्नामुळे श्रोते स्तब्ध झाले. ‘मदर्स डे’ या नाटकातून चिमुरड्यांनी समाजातील हे दाहक वास्तव मांडले.
औचित्य होते, तापडिया नाट्य मंदिरात सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण औरंगाबाद आयोजित 51 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव, हिंदी नाट्य स्पर्धा 2011-2012. तसेच 9 वा बालनाट्य महोत्सवाचे!
धनंजय सरदेशपांडेलिखित आणि दिग्दर्शित ‘मदर्स डे’ नाटक गुरुवारी अहमदनगर येथील स्नेहांकित मित्र मंडळाने सादर केले. स्वत:ला ‘आरजे’ समजणारी मिरची यांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यात मिरचीची भूमिका प्रतीक्षा थोरातने साकारली. नंद्या संकेत अहिरराव, डब्या स्नेहल थोरात,लंगड्या ऋषिकेश सोनवणे, केतकी, राधिका मगर यांनी भूमिका साकारल्या.
डोंबा-यांच्या वास्तवाची कथा - दुपारी ‘जाईच्या कळ्या’ हे नाटक अहमदनगरच्या बालकलावंतांनी सादर केले. यात डोंबा-याची मुलगी मुन्नी आणि शाळेत जाणारी सुमी यांच्यातील मैत्री, दोघींत असलेले एकमेकींच्या वास्तव जीवनाचे आकर्षण तसेच डोबा-यांच्या आयुष्यातील समस्या दाखवण्यात आल्या. मुन्नीचे पात्र आकांक्षा शिंदे तर सुमीचे पात्र प्रणाली विलायते हिने साकारले. तर राजा तथा प्रजा’ मधून सत्ताधा-यांवर भाष्य करण्यात आले.