आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ चिमुकल्यांनी बारा तास कवटाळून ठेवला आईचा मृतदेह, असा झाला मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्‍या आईच्‍या मृतदेहाजवळ बसलेली मुलगी. - Divya Marathi
आपल्‍या आईच्‍या मृतदेहाजवळ बसलेली मुलगी.
औरंगाबाद - रविवारी संध्याकाळी दोन बहिणी खेळत असताना आजारी आईने हाक दिली. मुली धावत घरात आल्या. आईने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून अखेरचा श्वास घेतला. आई नेहमीप्रमाणे न झोपलीय असे वाटल्याने दोघी आईला कवटाळून झोपी गेल्या. मात्र, सकाळी ती माऊली नेहमीप्रमाणे उठल्याने त्या घाबरल्या. तिच्या डोळ्याला मुंग्या लागल्याने काहीतरी वाईट झाल्याचे वाटले. गोंधळलेल्या अवस्थेत आईला तसेच सोडून शाळेत धाव घेतली आणि शिक्षकांना घडलेला प्रकार सांगितला. मग देवदूताच्या रूपात आलेल्या शिक्षकांच्या मदतीने आईची मरणानंतर सुटका झाली.

जयभवानीनगरात घडलेला हा प्रकार अनेकांचे हृदय हेलावून गेला. अनिता राजू निसर (१३) आणि सुशीला राजू निसर (१०) अशी या दोन बहिणींची नावे आहेत. त्यांचा एक भाऊ बालपणीच रागात घरातून निघून गेला. पुंडलिकनगरातील विजयनगर चौकातल्या मॉर्डन कन्या विद्यालयात त्या अनुक्रमे सहावी, चौथीत शिकतात. त्यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले. तर आई संगीता (४०) सतत आजारी असत. मिळेल ती कामे, धुणी भांडी करून त्यांचे घर चालत होते. मुलीही अाईला मदतीला जायच्या. रविवारी आईची प्रकृती खूपच बिघडली. अनिता, सुशीला आईची विचारपूस करायच्या. तिला पाणी, औषध द्यायच्या आणि बाहेर खेळायला निघून जायच्या. संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास आईने त्यांना हाक मारली. दोघी घरात आल्या. आईने डोळे भरून बघितले. डाेळ्यात पाणी आले. मग डोक्यावरून हात फिरवत आशीर्वाद दिला आणि अखेरचा श्वास घेतला.

आई झोपली आहे असे वाटल्याने दोघींनी आईच्या मृतदेहालाच कवटाळले आणि त्याही झोपी गेल्या. सकाळी डोळे उघडले तरी आई झोपेतच होती. अंगही गार पडले होते. कडक झाले होते. काहीतरी विपरीत घडल्याचे त्यांना जाणवले. दोघींनी दार बंद केले आणि थेट शाळेत धाव घेतली. वर्गशिक्षकाला हंबरडा फोडून ही बाब सांगितली. त्यांनी मुख्याध्यापिका टी. ए. देशमुख यांना सांगितली. त्यांनी ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक शेषराव जाधव यांना माहिती घेण्यास सांगितले. त्यांनी शिक्षक एकनाथ मोटे, शेख शफिक आणि राजेंद्र शिसोदे यांच्यासह मुलींच्या घरी धाव घेतली.
पुढे वाचा..
> शिक्षकांचा मदतीचा हात
>पोटच्या मुलींप्रमाणे सांभाळू
> संगोपन करणार
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...