आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदरशात मुलांना खिचडीतून विषबाधा; 25 मुले बाधित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिडकीन- गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा येथील एका मदरशात मुलांना खिचडीतून विषबाधा झाली. दरम्यान, शेंदुरवादा आरोग्य केंद्रात कुणीही जबाबदार नसल्याने मुलांना उपचारासाठी बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ही घटना शुक्रवारी घडली. यात सुमारे २५ मुले बाधित झाली असून त्यांच्यावर बिडकीन येथील  ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  
 
शेंदुरवादा येथील हजरत उबेबिन्त कॉफ अरबी मदरशात सुमारे ११० मुले शिक्षण घेत आहेत. नेहमीप्रमाणे हे विद्यार्थी गुरुवारी रात्री खिचडीचे जेवण घेऊन झोपले. दि. १४ एप्रिल रोजी सकाळी मुलांनी उठून नमाज पठण केले. तसेच सकाळी ९ वाजता  उरलेली खिचडी खाल्ली. त्यानंतर सुमारे २५ मुलांना मळमळ व उलट्या होऊ लागल्या. याप्रकरणी काही मुलांनी शिक्षक सरदार देशमुख यांना कळवले. शिक्षकांनी मुलांना त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु शेंदुरवादा केंद्रात डॉक्टर हजर नसल्याने व मुले अधिक असल्याने त्यांना तातडीने बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गोरे, डॉ. अाशिष वेदपाठक, परिचारिका उफाडे मॅडम, शेख आदींनी तातडीने उपचार केले. सर्व मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

बाधितांमध्ये शाहिद अब्दुल वाहेद, समीर शेख, सुभान शेख बुऱ्हान, मोईन शेख रिसाब, शेख इम्रान बादशहा, शेख जाहिर  अब्दुल वजीर, कैफ अब्दुल कदीर, तौफिक साकेर शेख,  कैफ उस्मान शेख, कय्युम सलमान, इर्शाद चाँद, समीर मोहंमद, शेख हुसेन जहांगीर, आबेद अलम, शेख अरबाज मेराज, अली हाजी नसीर, मोहंमद अबीद शेख, इम्रान शेख जहूर आदीे विद्यार्थी उपचार घेत असून घटनेची माहिती मिळताच बिडकीन ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिद्धार्थ गाढे, रत्नदीप जोगदड, पो.कॉ. दीपक देशमुख, वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुकुद देशमुख, शशिकांत तायडे, सुरेश केरे यांनी भेट दिली.

वाढदिवसाचे औचित्य साधून ५००० ची मदत
शेंदुरवादा येथील मदरशतील  २२ बाधित मुलांना शुक्रवारी उपचारसासाठी बिडकीन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलांना औषधीसाठी पैशाची गरज असल्याची माहिती येथील समाजसेवक बंडू पाटील कागदे यांना मिळाली. त्यांच्या कन्या अक्षदा हिचा वाढदिवस असल्याने त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून सदर मुलांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.  याप्रसंगी त्यांच्या दोन्ही मुली अक्षदा,गौरी तसेच एकनाथ हिवाळे,भिमाभाऊ टेके,  युसूफ पठाण, सलीम मिर्झा आदींची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...