आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताप, उलट्या अन् पोटदुखीने बालके हैराण, बाल रुग्णालयांत गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - धड पावसाळा नाही आणि उन्हाळाही नाही. यामुळे व्हायरल इन्फेक्शन होऊन एक ते सात वर्षे वयोगटातील बालके ताप, उलट्या अन्् पोटदुखीने हैराण झाली आहेत. गेल्या दहा दिवसांत बालरुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. वर्षभरात होणाऱ्या आजारांपैकी ५० टक्के केवळ लसीकरणाचा कोर्स पूर्ण केल्याने आजारी पडतात, अशी माहिती बालरोग तज्ज्ञांनी दिली. हे आजारपण तीन दिवसांच्या कालावधीत बरे होते. मात्र, अनेक पालक ताप येताच कमी झालेल्या प्लेटलेट वाढवण्यासाठी तांबड्या पेशी देण्याचा आग्रह धरतात. तो चुकीचा असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.

१९ जूननंतर पावसाने दडी मारली आहे. मात्र, दररोज कमी- अधिक प्रमाणात आकाश ढगाळलेले असते. या वातावरणाचा परिणाम बालकांच्या आरोग्यावर होत आहे. जवळपास प्रत्येक घरातील एक मूल ताप, उलट्या, जुलाब आणि पोटदुखीने हैराण होत आहे. काही जणांच्या घशात खाज सुटत अाहे. दम्याचे बालरुग्णही वाढत आहेत. हे सारे वातावरण बदलामुळे घडत आहे. व्हायरल इन्फेक्शनचा झपाट्याने प्रसार होत असल्याने पालक त्रस्त झाले आहेत.

‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने काही बालरोग तज्ज्ञांच्या दवाखान्यांना भेट दिली असता तेथे मोठी गर्दी असल्याचे दिसून आले. ताप कमी का होत नाही, असा पालकांचा डॉक्टरांना प्रश्न होता. काही जणांनी शाळेचे दिवस असताना मुलगा आजारी पडल्याने चिंता व्यक्त केली. अभ्यासाचे दिवस बुडू नयेत म्हणून औषधींसोबत प्लेटलेट द्या, असा आग्रही धरला होता. डेंग्यूमुळे गेल्या वर्षी १९ जण दगावले होते. त्यामुळे हा ताप डेंग्यूचा तर नाही ना, अशी भीती पालकांना अाहे.
लालचट्टे नसतील तर... : यासंदर्भात विचारणा केली असता डॉक्टरांनी सांगितले की, या इन्फेक्शनमध्ये पहिले तीन दिवस प्लेटलेटचे प्रमाण कमी होते. मूल मलूल दिसू लागते. यामुळे पालक घाबरून प्लेटलेट द्या, असे म्हणतात. प्रत्यक्षात २० हजारांपर्यंत प्लेटलेट असतील आणि त्वचेवर लाल चट्टे नसतील, शौचातून रक्तस्राव होत नसेल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. इन्फेक्शनचा तीन दिवसांचा कालावधी संपला की प्लेटलेट्स नैसर्गिकरीत्या पुन्हा वाढण्यास सुरुवात होते. मुख्य म्हणजे इंजेक्शनद्वारे दिलेल्या प्लेटलेटचे आयुष्य तासांचेच असते, हेही पालकांनी लक्षात घ्यावे. बालकांना संभाव्य आजारांपासून बचावासाठी पूर्ण लसीकरण गरजेचे आहे. दूषित पाणी, आहारातील बदलामुळे त्यांना इन्फेक्शन झाले तरी ती पहिल्या टप्प्यातील उपचाराने बरी होतात. म्हणून लसीकरण अत्यावश्यक आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, काय आहे डॉक्‍टरांचे मत..