आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभ चिनी गोल्डन अँरोव्हेना माशाचे मूल्य दोन लाख रुपये !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - फेंगशुई या चिनी वास्तुशास्त्रानुसार शुभ समजला जाणारा 20 किलो वजनाचा गोल्डन अँरोव्हेना मासा औरंगाबादच्या बाजारात दाखल झाला असून त्याची किंमत 2 लाख रुपये आहे. गारखेडा रोडवरील कासलीवाल सुवर्णयोग गोल्ड फिश अँक्वेरियममध्ये हा मासा विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याला ठेवण्यासाठी चिनी बनावटीचे अँक्वेरियम वापरण्यात आले आहे.
दक्षिण अमेरिकन व आफ्रिकन गोल्ड अँरोव्हेना (ड्रॅगन) फिशचे 12 प्रकार आहेत. चीनसह अमेरिका, आफ्रिका आणि भारतात माशांना शुभ मानले जाते. हे मासे चीनमधून सर्वप्रथम बंगळुरूत आयात केले जातात. त्यानंतर ते मुंबई व्हाया पुणे औरंगाबादेत येतात. वास्तुशास्त्रानुसार फिशपॉट घराच्या ईशान्य कोपर्‍यात ठेवल्याने संभाव्य संकटे टळतात. हे मासे बघून लहान मुलांची नजर स्थिर होते, रक्तदाब नियंत्रणात राहतो, अशी काही लोकांची धारणा आहे. शिवाय घर, हॉस्पिटल, तारांकित हॉटेल्स, मॉल, कंपन्यांची कार्यालये आदी ठिकाणी हा फिशटँक शोभेसाठी ठेवला जातो. छंद म्हणून अँक्वेरियम फिश पाळणार्‍या छांदिष्ट शौकिनांची या माशाला मोठी मागणी आहे.
चार वर्षांपूर्वी पुण्याहून आणला - वास्तुशास्त्रानुसार अँरोव्हेना फिश शुभ मानला जातो. चार वर्षांपूर्वी आम्ही हा मासा पुण्याहून 50 हजार रुपयांत विकत आणला.’’ - कल्पना बगडिया, ग्राहक रा. लक्ष्मण चावडी
दुकानात 28 प्रकारचे मासे - आमच्याकडे 28 प्रकारचे मासे विक्रीसाठी आहेत. त्यात दोन लाखांचा गोल्डन अँरोव्हेना, 8 हजार रुपये किमतीचा फ्लॉवर हॉर्न यांचा समावेश आहे. अँरोव्हेना हा शुभ समजला जातो. इतरही मासे मनाला आनंद देणारे असल्याने रोज ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी असते. - सुवर्णा गंगापूरकर, व्यापारी, गोल्डन फिश अँक्वेरियम