आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकुंदवाडी परिसरात मंगळसूत्र चोरांची दुसरी टोळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुकुंदवाडी परिसरातील तुकडोबानगर भागात बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले. गेल्या २४ तासांतील ही तिसरी घटना असून मंगळसूत्र चोरणारी दुसरी टोळी सक्रिय झाली असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली आहे. ही टोळीही लवकरच जेरबंद करू. गरज पडल्यास विशेष पथकही तयार केले जाईल, अशी माहिती शहर पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.

वैशाली सरदेशपांडे (६५) या बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास नातवाला फिरण्यासाठी घेऊन जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात अली असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार कल्याण शेळके पुढील तपास करीत आहेत.

मंगळसूत्रचोरट्यांनी ज्येष्ठ महिलांन केले टार्गेट : मंगळसूत्रचोरट्यांनी ज्येष्ठ महिलांना टार्गेट केल्याचे दोन दिवसांच्या घटनांवरून दिसून येते. ज्या महिला अधिक प्रतिकार करू शकत नाही त्यांच्यावर पाळत ठेवून चोरटे मंगळसूत्र हिसकावत आहेत.