आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्याला चीनचा फटका, तीन वर्षांत ५१ पैकी २५ स्टील कारखाने पडले बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- जालना सोने का पालना अशी म्हण मराठवाड्यात प्रचलित आहे. मात्र या सोन्याच्या पाळण्याला आता चीनच्या मंदीची झळ लागली आहे. उदासीन सरकारी धोरणे, चीनचे स्टीलरूपी ड्रॅगनचे भारतीय बाजारपेठंात जोरदार आक्रमण, महागडी वीज याचा मोठा फटका जालन्याच्या स्टील उद्योगांना बसला आहे. ३ वर्षांपूर्वी पूर्ण क्षमतेने अहोरात्र सुरू असलेल्या ५१ स्टील कारखान्यांना चीनच्या मंदीने पुरते घेरले. सध्या या ५१ पैकी केवळ २५ कारखाने सुरू आहेत.

या संदर्भात स्टील उद्योजक द्वारकाप्रसाद सोनी यांनी सांगितले, बांधकामासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या सळया (टीएमटी बार) हे येथील मुख्य उत्पादन. जगात २००८ मध्ये मंदी आली. त्याची थोडीफार झळ स्टील उद्योगाला बसली. त्यानंतर २०१० ते २०१२ या काळात जालन्यातील स्टील उद्योग एकदम भरभराटीस होता. स्टीलला उत्तम मागणी होती. परिसरातील सर्व म्हणजे ५१ कारखाने पूर्ण क्षमतेने उत्पादन करीत होती. मात्र, गेल्या तीन वर्षांत स्टील उद्योगात मंदीचे वारे घुमले. गेल्या वर्षीपासून त्याची झळ मोठ्या प्रमाणात जाणवते आहे. त्यातच चीनच्या अर्थचक्राला घरघर लागली. त्याचा फटका येथील स्टील उद्योगाला बसला. त्यामुळे गेल्या आठ - दहा महिन्यांत येथील २५ स्टील कारखाने बंद झाले आहेत.
सोनी म्हणाले, जालन्यातील ५१ स्टील कारखान्यांची स्टील उत्पादनाची क्षमता २६.७९ लाख मे. टन आहे. मात्र, वीज दरवाढ व मंदी यामुळे काही कारखाने बंद पडले, उत्पादन कमी झाले आहे. एकूण उत्पादन क्षमतेच्या केवळ ४८ टक्के उत्पादन सध्या होत आहे. याचा जोरदार फटका कारखानदार, कामगार, जालना शहरातील इतर पूरक उद्योगांना बसला आहे. जालन्यातील स्टील उद्योगातून प्रत्यक्षरीत्या पाच ते सात हजार जणांना रोजगार उपलब्ध होतो, तर यापेक्षा तिप्पट जणांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो. वीज दरवाढीचाही मोठा फटका या उद्योगाला बसला आहे. सध्या ज्यांची तग धरून राहण्याची क्षमता आहे, जे आहे त्या उत्पादन खर्चात मागणी व पुरवठ्याचा नियम पाळून उभे राहू शकतात असेच कारखाने सुरू आहे. त्यातच बांधकाम क्षेत्रावरही मंदीचे मळभ अाहे. अनेक पायाभूत प्रकल्प रखडले आहेत. जालन्यात मुख्यत: टीएमटी बारचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या सर्व घटकांचा परिणामही येथील स्टील उद्योगावर झाल्याचे सोनी यांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, चीन सरकारचे आक्रमक धोरण आणि जालन्याचे वास्तव
- कोणत्यावर्षी किती कारखाने झाले सुरु आणि कुती पडले बंद...
- जालना आणि चीनमधील तुलनात्मक आलेख