आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचन घोटाळ्यातील कामे तपासण्यासाठी समिती शहरात, कृष्णा खोरे, बॅरेजेसच्या कामांची पाहणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिंचन प्रकल्पाच्या किमती फुगवून नियमबाह्य कामे करून घोटाळा करणा-या सिंचन विभागातील दोषी अधिका-यांनी केलेली कामे तपासण्यासाठी राज्य शासनाची तीनसदस्यीय समिती मंगळवारी रात्री शहरात दाखल झाली. ब्रह्मगव्हाण, कृष्णा खोरे आणि बॅरेजेसच्या कामांची पाहणी करून प्रकल्पाची कागदपत्रे तपासल्यानंतर ही समिती मुंबईला परतणार आहे.

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य शासनाने चितळे समिती नेमली होती. समितीने सादर केलेल्या 32 पानांच्या संक्षिप्त अहवालात राज्यातील सोळा प्रकल्पांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सिंचन विभागाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंत्यांनी ब्रह्मगव्हाण, कृष्णा खोरे आणि गोदावरी पात्रात उभारलेल्या बॅरेजेसमध्ये घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पाच्या खर्चाची रक्कम फुगवून कामे करताना अधिका-यांनी तांत्रिक सल्लागार समितीची मंजुरी घेतली नाही. तसेच महाराष्ट्र जल नियामक प्राधिकरणाची (एमडब्ल्यूआरए) मंजुरी घेताच कामे केल्याने घोटाळा अधिका-यांनीच केल्याचे स्पष्ट होते, असे चितळे समितीने अहवालात नमूद केले आहे. व्याप्ती बदल कायदा 1999 आणि जून 2013 च्या सुधारित कायद्यानुसार कामे करण्याची आवश्यकता असताना झालेल्या सर्व कामांच्या तपासणीसाठी शासनाने समिती नियुक्त केली.

ब्रह्मगव्हाणला भेट
पुणे कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता डी. एन. मोडक यांच्या अध्यक्षतेखाली बुलडाणा येथील अधीक्षक अभियंता पी. के. पवार, कोयना बांधकाम मंडळाच्या उपअधीक्षिका वैशाली नारकर कामांच्या तपासणीसाठी 22 जुलै रोजी शहरात आल्या. या समितीने दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता अरुण कांबळे यांच्यासोबत ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेसह बॅरेजच्या कामांची पाहणी केली. दरम्यान, मोडक यांनी बोलण्यास नकार दिला.

समितीने बोलावल्यास हजर होऊ
तीनसदस्यीय समितीने बोलावल्यास आम्ही त्यांच्यासमोर हजर होऊन आवश्यक ती कागदपत्रे दाखवू. आमच्या अधिका-यांची चौकशी केलेली नाही.
सी. ई. बिराजदार, कार्यकारी संचालक, गोदावरी महामंडळ