आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे उपराष्ट्रपती आज शहरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चीनचे उपराष्ट्रपती ली युआन्चो मंगळवार आणि बुधवार दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. आज रात्री ९.५५ वाजता त्यांचे विमानतळावर आगमन होईल. नंतर ते हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे मुक्काम करतील. बुधवारी ते अजिंठा लेणींना भेट देतील. त्यांच्या सुरक्षेसाठी सोमवारी मॉकड्रिल घेण्यात आले. तसेच १२०० पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. यामध्ये २४ पोलिस निरीक्षक, २६ पोलिस उपनिरीक्षक ११०० पोलिस कर्मचारी, एसआरपीच्या तुकड्यांचा समावेश आहे. केंद्रीय गुप्तचर खात्याची सुरक्षा पुरवली जात आहे. विमानतळावर कडक बंदोबस्त ठेवला आहे. प्रवाशांशिवाय अन्य कुणालाही प्रवेश असणार नाही.