आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे उपराष्ट्रपती ली युआंचो यांचे स्वागत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनचे उपराष्ट्रपती ली युआंचो यांचे औरंगाबाद दौऱ्यासाठी मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरात आगमन झाले. चिकलठाणा विमानतळावरून त्यांचा ताफा हॉटेल रामामध्ये दाखल झाला. भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक अतिथी आपला पाहुणाच आहे. दोन्ही देशांतील संबंध सुरळीत करणे, औरंगाबाद शहराच्या विकासात मदत करणे यासाठी हे पाहुणे आले आहेत. त्यामुळे त्यांचे स्वागतच आहे. आम्ही त्यांचा पूर्णपणे सन्मानच करतो. पण ते करत असताना आम्हा औरंगाबादकरांना त्रास कशासाठी? असा सवाल जालना रोडवरून मंगळवारी रात्रीच्या सुमारास जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येकाला पडला होता. कारण पाहुण्यांना चिकलठाणा विमानतळ ते रामापर्यंत येण्यास अडथळा येऊ नये म्हणून दोन तास वाहतूक बंद केली होती. नंतर ती खुली झाल्यावर वाहनांच्या नियंत्रणासाठी पुरेसा बंदोबस्तही प्रशासनाने ठेवला नव्हता. बुधवारी युआंचो अजिंठा लेणी पाहण्यासाठी जाणार आहेत. त्यावेळी तरी सामान्य नागरिकांना कमीत कमी मन:स्ताप होईल, याची काळजी घेतली जावी, एवढीच अपेक्षा आहे.

चीनचे उपराष्ट्रपती ली युआंचो यांचे मंगळवारी रात्री शहरात आगमन झाले. ते हाॅटेल रामा इंटरनॅशनलमध्ये थांबले असून, त्यांच्या आगमनाच्या वेळी जालना रोडवरील दोन्हीकडील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय झाली.
बातम्या आणखी आहेत...