आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुधाची टंचाई असलेल्या गावातून चितळे उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुधाची टंचाई होती त्या गावात दूध विकण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला घरीच श्रीखंड अन् चक्का तयार करून दुकानदारांना विकला. या उत्पादनांसाठी स्वत:चे दुकाने हवे, या विचारातून पुण्यात आलो अन् पहिले दुकान सुरू केले. अशी छोटी पावले उचलत वाटचाल सुरू ठेवली यातूनच चितळे उद्योगसमूह उभा राहिला. छोट्या-छोट्या निर्णयातूनच मोठा व्यवसाय होतो, असे मत व्यक्त करीत पुण्यातील चितळे उद्योग समूहाचे संचालक नानासाहेब चितळे यांनी आठवणींना उजाळा दिला.
ब्रह्माेद्योग संमेलनानिमित्त नानासाहेब, त्यांच्या पत्नी पद्मजा सून स्मिता हे दोन दिवस शहरात होते. हॉटेल ताज येथे त्यांचा मुक्काम होता. दिव्य मराठीशी संवाद साधताना ते म्हणाले, सातारा जिल्ह्यातील लिंबगोवे हे आमचे मूळ गाव कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. त्या काळात दुधाची प्रचंड टंचाई होती. १९४० चा काळ होता तो. वडिलांनी तेथेच दूधविक्रीचा व्यवसाय सुरू केला. मग चक्का श्रीखंडही घरीच करून दुकानदारांना देऊ लागलो. पण मालाच्या विक्रीसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागे. त्यामुळे मोठे भाऊ रघुनाथ यांनी पुण्यात दुकान घेण्याचा निर्णय घेतला अन् तेथून खरी भरभराट झाली.

रेल्वेस्टाफला पुरवले श्रीखंड : नानासाहेबम्हणाले, त्या काळात श्रीखंडापेक्षा चक्काच जास्त वापरला जाई. आयते श्रीखंड मुंबईत विक्री करण्याचे ठरवले तेव्हा प्रथम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना पुरवू लागलो. मुंबईतून हळूहळू मागणी वाढली तेव्हा मोठ्या भावाला त्यांचा मित्र सदाशिव तांबे यांनी भिलवडी या ठिकाणी एक युनिट घेऊन दिले. तेथे दुधाचे पाश्चरायझिंग सुरू केले. पुणे-मंुंबई शहरानंतर अवघ्या महाराष्ट्रातून मालाची मागणी वाढली.

आता तिसरी पिढी सांंभाळते व्यवसाय
चितळे समूहाचा कारभार आता तिसरी पिढी सांभाळत अाहे. नानासाहेबांचा मुलगा ,सून आणि नातवंडे हा व्यवसाय पुढे नेत आहेत. जगाच्या सर्व कानाकोपऱ्यात आता आम्ही माल पुरवतो, असे स्मिता चितळे यांनी अभिमनाने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...