आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असावा सुंदर चॉकलेटचा महाल!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चॉकलेट डे हा व्हॅलेन्टाइन वीकमधील सगळ्यांचा आवडता दिवस. होकार असेल, तर तोंड गोड करायचे आणि नकार असेल, तरीही वाईट न मानता चॉकलेट्स खाऊन मैत्री मात्र कायम ठेवायची, असे त्यामागील बाँडिंग असते. याच वीकमध्ये मैत्रीत आलेला दुरावा दूर करण्यासाठीही तोंड गोड करून चॉकलेट डे साजरा केला जातो. सध्या मिळणार्‍या विविध प्रकारच्या चॉकलेट्समुळे दिवसेंदिवस या डेची धमाल अधिकच रंगत आहे.

चॉकलेटची सवय चांगली अन् वाईटही
चॉकलेटमध्ये अँन्टी ऑक्सिडंट तत्त्व असल्याने मेंदू आणि हृदयासाठी अतिशय उत्तम आहे. शरीरात कॉपर, पोटॅशियम, मॅग्नेशियमची आवश्यकता असते तसेच याचीही आवश्यकता आहे. कॅडबरी चॉकलेटमध्ये असलेल्या फेनिल इथेलामाइनमुळे मूड चांगला होतो. कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी हे खाणे अतिशय उत्तम आहे. याशिवाय त्वचेची कांती उजळवण्यासाठी चॉकलेटची महत्त्वाची भूमिका आहे; पण असे असले तरीही यामध्ये साखर असल्याने याचा तोटासुद्धा आहे. यामध्ये मधुमेहाचा धोका आहे. अति चॉकलेट खाण्याने चिडचिडेपणा वाढून एकाग्रता ढासळते. - डॉ. संगीता देशपांडे, आहारतज्ज्ञ.

चॉकलेटचा सर्वाधिक परिणाम दातांवर
आपल्याकडे अलीकडील पिढीमध्ये चॉकलेट्समुळे दात किडण्याचे प्रमाण प्रचंड आहे. चॉकलेट चिकट असल्याने हे दातांमध्ये चिकटते. बॅक्टेरियांशी त्यांचा संबंध आला की, लॅक्टिक अँसिड तयार होते. यामुळे दातांवरील इनॅमलचा थर निघून जातो आणि दात क मकुवत होतात. हाडांपेक्षा कठीण असणार्‍या या थराला तोडण्याचे काम चॉकलेट करते. हे दातांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. चॉकलेट खाल्यानंतर चूळ भरणे, ब्रश करणे अतिशय महत्त्वाचे आहे. डॉ. तेजस मुंढे, डेंटिस्ट

औरंगाबादचे चॉकलेट्स
चॉकलेट लॉली पॉप, रोझ, ताजमहाल, हार्ट शेप, चौकोनी, गोल, त्रिकोणी, बार, नाव, बुकेच्या आकारातील वैविध्यपूर्ण चॉकलेट्स पाहून कुणीही थबकेल. सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या प्रदर्शनात स्नेहा वेद यांचा हा निराळा स्टॉल सर्वांचे लक्ष वेधत आहे. 5 रुपयांपासून 1 हजारांपर्यंत चॉकलेटची निर्मिती त्यांनी स्वत:च्या कल्पकतेतून केली आहे. 26 जानेवारीपासून त्यांनी या गृहउत्पादनाला सुरुवात केली.

अत्यल्प दर आणि मध्यम वर्गाला परवडेल अशा पार्ले चॉकलेट्सची जादू आजही कायम आहे. चॉकलेट्सचे विविध ब्रँड आता उपलब्ध आहेत. भारतीय चॉकलेट सोबतच परदेशी कंपन्यांचे चॉकलेट्स आले आहेत. मात्र, पार्लेच्या किस-मी, लंडन डेअरी, मेलडी, ऑरेंज कँ डी, किस मी बार आणि कच्चा मँगो या चॉकलेट्स आवर्जून घेतल्या जातात. ‘मेलडी खाओ खुद जान जाओ’ ही जाहिरात आजही अनेकांना लक्षात आहे. 12 ते 13 लाखांची उलाढाल पार्ले चॉकलेट्सची आहे. - ललित सुराणा, सुराणा ट्रेडिंग कंपनी

गृहउद्योग नावाने मेघा प्रयाग यांनी कुलर्शी चॉकलेट्सची निर्मिती केली. चॉकलेट केवळ उत्पादन करून त्या विकत नाहीत. मात्र, ऑर्डरप्रमाणे हव्या असलेल्या फ्लेव्हरची चॉकलेट्स त्या बनवून देतात. मिल्क चॉकलेट, डायफ्रूट चॉकलेटच्या गेल्या वर्षभरात अनेक ऑर्डर त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. चव आणि गुणवत्तेबाबत त्या चोखंदळ असल्याने अल्पावधीत त्यांचे हे चॉकलेट लोकप्रिय होऊ लागले आहे.

त्रिमूर्ती फूड प्रॉडक्ट्सचे अतुल बांगीनवार यांनी गोपीमलाई, फ्रूटबेरी आणि फ्रूटलेस खट्टीमिठी या तीन चॉकलेट्सचे उत्पादन सुरू केले आहे. खव्यापासून बनवलेली गोपीमलाई शरीरासाठी पौष्टिक आहे. फ्रूटबेरीमध्ये विविध फळांचा वापर केलेला असल्याने वैविध्यपूर्ण फळांचा अनुभव घेता येतो. फ्रूटबेरीमध्ये चिंचेचा वापर करण्यात आला आहे. बांगीनवार यांनी 1995 मध्ये स्टेशन रोडला चॉकलेट उत्पादनाला सुरुवात केली. त्यांनी जपानमध्ये जाऊन चॉकलेट निर्मिती प्रक्रिया आत्मसात केली.