आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत दहा हजारांचा ‘07’ चॉइस नंबर लिलावात 16 हजारांना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चॉइस नंबरसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात मंगळवारपासून लिलाव पद्धत सुरू झाली. पहिल्याच दिवशी 12 नंबर वितरित झाले. दहा हजार रुपये शासकीय शुल्क असलेला 07 हा क्रमांक 16 हजार रुपयांना संजय जीवनवाल यांना मिळाला. नवीन पद्धतीमुळे शासनाच्या तिजोरीत 33 हजार रुपये अधिक जमा झाल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी सांगितले.

नवीन पद्धतीला वाहनधारकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. 12 नंबरची विक्री करून नियमाप्रमाणे केवळ 77 हजार रुपये जमा झाले असते, मात्र लिलाव पद्धतीमुळे एक लाख सहा हजार रुपये जमा झाले.

अशी आहे पद्धत : ज्या नंबरसाठी एकापेक्षा जास्त ग्राहकांची मागणी येईल तो क्रमांक लिलावाने विकला जाईल. शासनाने ठरवून दिलेली रक्कम ही सर्वात कमी असेल. जो सर्वाधिक रकमेचा डी.डी. जमा करेल त्याला नंबर मिळेल. ज्याच्या नावावर वाहन असेल त्यालाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल. 30 दिवसांसाठी चॉइस नंबर ग्राह्य धरला जाईल.

सर्वाधिक बोली लागलेले पहिले तीन नंबर
>एमएच 20 सीव्ही 07 : शासकीय शुल्क 10 हजार, बोली 16 हजार : संजय जीवनवाल
>एमएच 20 सीव्ही 02 : शासकीय शुल्क 10 हजार, बोली 15 हजार 200 : असीम पटेल
>एमएच 20 सीव्ही 11 : शासकीय शुल्क 10 हजार, बोली 15 हजार - हरिश्चंद्र राजपूत