आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिसमस, नववर्षाच्या पर्यटनात निम्मी घट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ख्रिसमसच्यासुट्यांमध्ये पर्यटनातील धमाल मस्तीला यंदा चांगला ब्रेक लागला आहे. औरंगाबादहून देश-विदेशात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत या वेळी अर्ध्यावर आली आहे. सुट्या जाहीर होण्यापूर्वी गतवर्षी दहा हजार जणांनी बुकिंग केले होते. आता मात्र हा आकडा पाच हजारांपर्यंत रोडावला. टुरिस्ट एजन्सीकडून प्रातिनिधिक स्वरूपात मिळवलेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे. विमान प्रवासाचे वाढीव दर आणि मंदीचे कारण त्यामागे असल्याचा अंदाज आहे.
ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी २० डिसेंबरपर्यंत दहा हजार जणांनी बुकिंग केले होते. देश-विदेशात पर्यटनासाठी अॅडव्हान्स बुकिंगचा ट्रेंड आहे. त्यानुसार गतवर्षी दहा हजार जणांनी बुकिंग केले होते. त्यापैकी हजार विदेशात तर हजार जणांनी देशांतर्गत पर्यटन केले. या वेळी मात्र हा आकडा पाच हजारांपर्यंत रोडावला. पुष्पक हॉलिडेमध्ये यंदा फक्त पाचशे जणांनी बुकिंग केले असून त्यापैकी विदेशवारीसाठी फक्त ५० जणांनी पसंती दिली आहे. ठक्कर टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक नितीन ठक्कर यांच्या मते सध्या बाजारात तेजी नसल्याने जवळपास ५० टक्के तूट दिसून येते आहे.
पन्नास टक्क्यांची घट
-पूर्वीवर्षातील बाराही महिने पर्यटन होत असे. आता या व्यवसायात फार तेजी नाही. त्यामुळे दविसेंदविस पर्यटकांची संख्या रोडावत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचे बुकिंग जवळपास अर्ध्यावर आहे. जसवंतसिंग,पी.आर. हॉलिडे
विमानदरवाढीचा परिणाम
-पूर्वीविमानाचे दर पर्यटकांच्या आवाक्यात होते. आता मात्र साधे मुंबईला जाण्याचा खर्च हजारांपर्यंत आहे. देशांतर्गत असो किंवा विदेशात, पर्यटक विमानाने जाण्याला प्राधान्य देत होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत विमानाचे दर दुप्पट झाल्याचा हा परिणाम म्हणता येईल. आशुतोषबडवे, संचालक,पुष्पक हॉलिडे

देशात केरळ तर विदेशात सिंगापूरची चलती
सर्वाधिकपसंती केरळसाठी मिळाल्याच्या एजन्सीकडे नोंदी आहेत. विदेशातील पर्यटनासाठी सिंगापूरला अधिक बुकिंग झाले आहे. त्यानंतर दुबई, मॉरिशस, बँकॉक, थायलंड, श्रीलंकेला जाण्याचा पर्यटकांचा ओढा आहे. देशांतर्गत पर्यटनासाठी मात्र केरळनंतर बंगळुरू,म्हैसूर, उटी आणि अंदमान-निकोबारला पसंती आहे.